scorecardresearch

बदलापूर : केंद्रीय मंत्र्यांच्या बनावट फेसबुक खात्यावरून पैशांची मागणी ; मंत्री कपिल पाटील यांच्यातर्फे नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार

केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांचे बनावट फेसबूक खाते उघडून, अज्ञात व्यक्तीकडून फ्रेंड रिक्वेस्ट पाठविल्या जात होत्या.

बदलापूर : केंद्रीय मंत्र्यांच्या बनावट फेसबुक खात्यावरून पैशांची मागणी ; मंत्री कपिल पाटील यांच्यातर्फे नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार
केंद्रीय मंत्री आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार कपिल पाटील यांच्या नावे फेसबुकवर बनावट खाते उघडून त्याद्वारे अनेकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून पैशांची मागणी केली जात आहे.

केंद्रीय मंत्री आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार कपिल पाटील यांच्या नावे फेसबुकवर बनावट खाते उघडून त्याद्वारे अनेकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून पैशांची मागणी केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मंत्री कपिल पाटील यांच्या वतीने नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. अशा बनावट खात्यावरून रिक्वेस्ट स्वीकारू नये तसेच पैसेही पाठवू नये असे आवाहन पाटील यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा >>> पालिकेच्या शाळांमध्ये लवकरच सेमी इंग्रजीचा प्रयोग ; अंबरनाथ पालिकेला प्रस्ताव देण्याच्या आमदार डॉ. किणीकरांच्या सूचना

केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांचे बनावट फेसबूक खाते उघडून, अज्ञात व्यक्तीकडून फ्रेंड रिक्वेस्ट पाठविल्या जात होत्या. त्याचबरोबर ऑनलाईन पैशांची मागणी केली जात आहे. एका व्यक्तीला या मंत्री महोदयांच्या बनावट खात्यावरून १५ हजार रूपयांची मागणी करण्यात आली होती. हा प्रकार समोर आल्यानंतर हे बनावट खाते कुणीतरी चालवत असल्याचा संशय आला. त्यामुळे मंत्री कपिल पाटील यांच्या कार्यालयाकडून नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यावरून अज्ञात व्यक्तिविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मंत्री पाटील यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. या खात्यावरून आलेल्या रिक्वेस्ट कोणीही स्विकारू नयेत. तसेच कोणीही पैसे पाठवू नयेत. आपल्याबाबतीत असा प्रकार झाला असल्यास, तातडीने केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांच्या कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या