केंद्रीय मंत्री आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार कपिल पाटील यांच्या नावे फेसबुकवर बनावट खाते उघडून त्याद्वारे अनेकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून पैशांची मागणी केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मंत्री कपिल पाटील यांच्या वतीने नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. अशा बनावट खात्यावरून रिक्वेस्ट स्वीकारू नये तसेच पैसेही पाठवू नये असे आवाहन पाटील यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा >>> पालिकेच्या शाळांमध्ये लवकरच सेमी इंग्रजीचा प्रयोग ; अंबरनाथ पालिकेला प्रस्ताव देण्याच्या आमदार डॉ. किणीकरांच्या सूचना

Narendra Modi, Pune, Road Show,
पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जाहीर सभेबरोबरच ‘रोड शो’
Narendra Modi, Pune, Road Show,
पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जाहीर सभेबरोबरच ‘रोड शो’
cm eknath shinde lok sabha marathi news, thane lok sabha marathi news
विश्लेषण: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यावर भाजप नेते हक्क का सांगतात? भाजपच्या रेट्यासमोर शिंदेसेनेची कोंडी?
gulabrao patil
चावडी: बाळासाहेब भवन की ?

केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांचे बनावट फेसबूक खाते उघडून, अज्ञात व्यक्तीकडून फ्रेंड रिक्वेस्ट पाठविल्या जात होत्या. त्याचबरोबर ऑनलाईन पैशांची मागणी केली जात आहे. एका व्यक्तीला या मंत्री महोदयांच्या बनावट खात्यावरून १५ हजार रूपयांची मागणी करण्यात आली होती. हा प्रकार समोर आल्यानंतर हे बनावट खाते कुणीतरी चालवत असल्याचा संशय आला. त्यामुळे मंत्री कपिल पाटील यांच्या कार्यालयाकडून नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यावरून अज्ञात व्यक्तिविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मंत्री पाटील यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. या खात्यावरून आलेल्या रिक्वेस्ट कोणीही स्विकारू नयेत. तसेच कोणीही पैसे पाठवू नयेत. आपल्याबाबतीत असा प्रकार झाला असल्यास, तातडीने केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांच्या कार्यालयाकडून करण्यात आले आहे.