Badlapur sexual assault: बदलापूरमधल्या एका नामांकित शाळेत स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या अक्षय शिंदेने दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. यानंतर २० ऑगस्टला बदलापूरमध्ये प्रचंड जनक्षोभ पाहण्यास मिळाला. संतप्त जमावाने शाळेची तोडफोड केली. रेल रोको केला. त्याचप्रमाणे अक्षय शिंदेच्या घराची प्रचंड तोडफोड केली असं त्याच्या शेजारी राहणाऱ्यांनी सांगितलं आहे.
मंगळवारी काय घडलं?
Badlapur sexual assault मंगळवारी (२० ऑगस्ट) शेकडो लोकांचा जमाव आला. हा जमाव नामांकित शाळेबाहेर निदर्शनं करत होता. तसंच बदलापूर रेल्वे स्टेशनवर सुमारे ९ तास रेल रोको करण्यात आला. आरोपी अक्षय शिंदे याचं घर बदलापूर येथील गावदेवी मंदिराजवळ आहे. या ठिकाणी तो भाडे तत्त्वावर असलेल्या घरात राहतो. या प्रकरणात पोलिसांनी अक्षय शिंदेला अटक केली अशी माहिती आरोपीच्या शेजारी राहणाऱ्या लोकांनी इंडियन एक्स्प्रेसला दिली.
नेमकी घटना काय घडली?
बदलापूर येथील नामांकित शाळेत जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक (Badlapur sexual assault ) अत्याचार करण्यात आला. शाळेतला सफाई कर्मचारी अक्षय शिंदे याने हे अत्यंत घृणास्पद कृत्य (Badlapur sexual assault ) केलं. दरम्यान या घटनेचा उद्रेक बदलापूरमध्ये २० ऑगस्टच्या दिवशी पाहण्यास मिळाला. बदलापूरमध्ये रेल रोको आंदोलन करत आंदोलकांनी सुमारे ९ तास लोकल सेवा ठप्प केली होती.
अक्षय शिंदेच्या घराशेजारी राहणाऱ्या लोकांनी काय सांगितलं?
बदलापूरमध्ये झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाचा (Badlapur sexual assault ) निषेध नोंदवत २० ऑगस्टला मोठ्या प्रमाणावर जमाव बदलापूरमध्ये आला होता त्यांच्यात बरेच तरुण होते. त्यांनी आरोपीच्या घरावर हल्लाच केला. तसंच त्याच्या कुटुंबियांवरही हल्ला केला आणि घरातलं फर्निचर तोडलं. अशी माहिती एका शेजाऱ्याने दिली. आणखी एका शेजाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार अक्षय शिंदेची पत्नी त्याला सोडून गेली आहे. ती तिच्या घरी राहते. तर आणखी एका शेजाऱ्याने सांगितलं की मंगळवारी मोठा जमाव या ठिकाणी आला. त्यांनी अक्षय शिंदेच्या नातेवाईकांना मारहाण केली. त्यावेळी जमाव मोठ्या प्रमाणावर असला तरीही पोलीस नव्हते.
Badlapur sexual assault बुधवारी या ठिकाणी तीन पोलीस बंदोबस्तासाठी आले. मात्र या प्रकरणात कुठलीही FIR नोंदवण्यात आली नसल्याची माहिती समोर आली आहे. इंडियन एक्स्प्रेसने या संदर्भात जेव्हा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला तेव्हा ते प्रतिक्रिया देण्यासाठी उपस्थित नव्हते.