वातावरणातील बदलामुळे तापमान वाढताच विविध ठिकाणी डोंगरांंना वणवे लागल्याचे दिसून आले आहे. शनिवार आणि रविवार हा वणव्यांचा वार ठरला. अंबरनाथ तालुक्यातील अंबरनाथ, बदलापूर आणि वांगणी अशा तीन ठिकाणी वणवे पेटले. बदलापुरच्या टाहुलीच्या डोंगरावरचा वणवा मोठ्या प्रमाणावर पसरला होता. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या शर्तीच्या प्रयत्नानंतरही हा वणवा रोखण्यात पूर्णतः यश आले नाही. मात्र गिर्यारोहक किंवा पर्यटकांकडून हा वणवा लावला गेल्याची शक्यता वन विभागाने व्यक्त केली आहे.

हेही वाचा >>>डोंबिवलीत सेल्फी काढल्याच्या रागातून आई, मुलीला मारहाण

three thousand families staying near waldhuni river boycotting lok sabha election, construction within river bed
कल्याणमध्ये वालधुनी नदी परिसरातील तीन हजार कुटुंबीयांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार
Torrential rain with hail in Shirol and Hatkanangle taluka
शिरोळ, हातकणंगले तालुक्यात गाऱ्यांसह वळिवाची दमदार हजेरी; उन्हात गरव्याची सुखद अनुभूती
Auctions in market committees of Nashik district also stopped for fifth day
नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांतील लिलाव पाचव्या दिवशीही ठप्प
(11 goats died in attack by stray dogs in Jalgaon )
जळगावात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात ११ बकर्‍या मृत्युमुखी

अंबरनाथ तालुक्यात मोठी वनसंपदा आहे. अंबरनाथ शहराच्या पश्चिम भागात असलेली आयुध निर्माणीचे बहुतांश क्षेत्र घनदाट झाडांनी व्यापले गेलेले आहे. अंबरनाथ तालुक्याच्या वेशीवरही चांगले जंगल आहे. अंबरनाथ पूर्वेला हाजीलमंग ते टाहुली आणि थेट माथेरानच्या पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील अशी डोंगररांग आहे. गेल्या काही वर्षात या जंगलात विविध प्रकारचे प्राणीही येथे मुक्त संचार करताना आढळले होते. बिबट्यापासून रानगवा आणि विविध प्राणी पक्षी मुक्तपणे संचार करत असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे जंगलाची वाटचाल संपन्नतेकडे होत असल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये समाधानाचे वातावरण होते. मात्र गेल्या काही वर्षात फेब्रुवारी ते मे महिन्यापर्यंत लागणाऱ्या वणव्यांमुळे वनसंपदेवरचा धोका कायम आहे. गेल्या काही दिवसांपासून अंबरनाथ तालुक्याच्या विविध भागांमध्ये वणवे लागल्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या आठवड्यात आयुध निर्माणीत वणवा लागला होता. त्यानंतर अंबरनाथच्या फॉरेस्ट नाका भागात वणवा पेटला होता. शनिवारपासून अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यानच्या टाहुलीच्या डोंगररांगांमध्ये वणवा पेटतो आहे. रविवारी अशाच प्रकारे बदलापूर पूर्वेतील टाहुलीच्या डोंगररांगेत मोठ्या प्रमाणावर वणवा पेटला होता. रात्री उशिरापर्यंत हा वणवा पेटल्याचे दिसून आले. तत्पूर्वी वागणीतही अशाच प्रकारचा वणवा पेटला होता. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हा वणवा विझवण्यासाठी धाव घेतली. तो वणवा शमत नाही तोच बदलापुरच्या या डोंगरावर वणवा पेटल्याने वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. त्यांनी सायंकाळच्या सुमारास बदलापुरच्या डोंगरावर धाव घेतली होती.

हेही वाचा >>>ठाणे: साहाय्यक आयुक्त महेश आहेर मारहाण प्रकरण; अटकेतील चारही आरोपींना न्यायालयीन कोठडी

रात्री उशिरापर्यंत वन विभागाचे कर्मचारी वणवा विझवण्यासाठी प्रयत्नशील होते अशी माहिती वनक्षेत्रपाल विवेक नातू यांनी दिली आहे. चार पथके विविध मार्गाने वणवा विझवत होते. काही ठिकाणी जाळ रेषा घेतली असल्याने वणवा थांबला. मात्र दरीतल्या ठिकाणी वणवा रोखता आला नाही, अशीही माहिती नातू यांनी दिली.