ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापाठोपाठ बाळासाहेबांची शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा सूर लावला असून या संबंधीच्या मागणीचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आपल्या युतीत हि जागा भारतीय जनता पक्षाला गेली आहे, परंतु राज्याचे प्रमुख या नात्याने आपण भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून हि निवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. जेणेकरून आपल्या महाराष्ट्रच्या राजकीय संस्कृतीचे जतन तर होईलच, पण त्याच सोबत दिवंगत आमदार रमेश लटके यांना देखील एक वेगळ्या पद्धतीने श्रद्धांजली ठरेल, असे मत सरनाईक यांनी पत्रात व्यक्त केले आहे.

हेही वाचा >>> ठाणे : बंजारा भवन, पोहरादेवी विकास आणि सेवालाल महाराज जयंतीच्या दिवशी सुट्टी ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

Ambadas Danve on asaduddin owaisi
‘खान पाहिजे की बाण?’, बाळासाहेबांची ही भूमिका उबाठा गटाने का बदलली? अंबादास दानवेंनी केलं स्पष्ट
An account of the work done in 10 years is presented in BJP resolution
‘मोदी की गॅरंटी’चा जाहीरनाम्यात पुनरुच्चार; भाजपच्या ‘संकल्पपत्रा’त १० वर्षांतील कामांचा लेखाजोखा सादर
Conspiracy of sugar mills owners against me Raju Shettys allegation
माझ्या विरोधात साखर कारखानदारांचे षडयंत्र; राजू शेट्टी यांचा आरोप
girish mahajan statement on bjp mp unmesh patil
खासदार उन्मेश पाटील यांना चुकीची जाणीव होईल; गिरीश महाजन यांचा सूचक इशारा

दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या निधनाने अंधेरी (पूर्व) भागात विधानसभेची पोटनिवडणूक होऊ घातली आहे. तिथे त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि आपल्या युतीचे उमेदवार त्यांच्या विरुद्ध निवडणूक लढवत आहेत. रमेश लटके जेव्हा आपल्या कुटुंबियांच्या समवेत दुबईमध्ये गेले होते, तेव्हा माझे मित्र व उद्योगपती राज शेट्टी यांच्याच हॉटेलमध्ये ते थांबले होते. तिथे त्यांना हृदयविकाराचा झटका आला. हे कळताच राज शेट्टी यांनी तेथे धाव घेतली आणि ताबडतोब त्यांना वैद्यकीय मदत केली. परंतु त्या पूर्वीच त्यांचे निधन झालेले. राज शेट्टी यांनी सर्वप्रथम दुबई येथून फोन करून हि घटना मला सांगितली. तेव्हा अक्षरशः धक्का बसला, काही सुचेना झाले. मी ताबडतोब आमदार सुनील राऊत व तत्कालीन परिवहन मंत्री अनिल परब यांना हि घटना फोन करून कळवली. त्यानंतर राज शेट्टी यांनी दुबई सरकारचे अत्यंत खडतर असे सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून लवकरात लवकर मृतदेह विमानाने मुंबईत पोहचवण्यासाठी सर्वतोपरी मदत केली. आजही तो प्रसंग आठवला तर मनाला वेदना होतात, असे सरनाईक यांनी पत्रात म्हटले आहे.

हेही वाचा >>> पोलिसांच्या तावडीतून सुटका करण्यासाठी चोरट्याचे बेशुध्दीचे ढोंग ; कल्याणमधील रहेजा संकुलातील प्रकार

रमेश लटके हे माझे अत्यंत जवळचे मित्र होते. विधानसभेत काम करत असताना मी, सुनील राऊत आणि रमेश लटके आम्ही तिघे अनेक महत्वाच्या विषयांवर एकत्रित बसून सल्ला मसल्लत करायचो. रमेश लटके नेहमी त्यांच्या मतदारसंघातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी विधानसभेत आवाज उठवायचे, लोकांच्या प्रति काम करण्याची त्यांची तळमळ मी जवळून पाहिली आहे. शाखाप्रमुख पासून नगरसेवक आणि आमदार असा अत्यंत खडतर प्रवास त्यांनी केला होता. मला आजही आठवते कि, मृत्यूपूर्वी काही दिवस अगोदर लटकनी अंधेरी भागात खूप मोठा कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्याला प्रमुख पाहुणे म्हणून आपण उपस्थित होतात. मी देखील त्या कार्यक्रमास आपल्या समवेत उपस्थित होतो, अशा जुन्या आठवणींना त्यांनी उजाळला दिला आहे. महाराष्ट्राची एक विशेष अशी अलिखित राजकीय संस्कृती आहे. जेव्हा एखादा लोकप्रतिनिधी मृत्युमुखी पडतो, तेव्हा आपण त्यांच्या कुटुंबियांना बिनविरोध निवडून देण्याचा एक पायंडा आहे. हि निवडणूक बिनविरोध होण्याच्या दृष्टीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील पत्राद्वारे त्यांचे मत मांडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेससह अनेक पक्षांनी हिच भूमिका घेतली आहे. आपल्या युतीत हि जागा भारतीय जनता पक्षाला गेली आहे, परंतु राज्याचे प्रमुख या नात्याने आपण भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून हि निवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. जेणेकरून आपल्या महाराष्ट्रच्या राजकीय संस्कृतीचे जतन तर होईलच, पण त्याच सोबत दिवंगत आमदार रमेश लटके यांना देखील एक वेगळ्या पद्धतीने श्रद्धांजली ठरेल, असे मत सरनाईक यांनी पत्रात व्यक्त केले आहे.