ठाणे : दिवावासियांची कचराभुमीच्या समस्येतून सुटका करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून शहराबाहेर म्हणजेच भांडार्ली गावात उभारण्यात आलेल्या कचरा प्रकल्पासाठी भाडे तत्वावर घेण्यात आलेल्या जागेचा करार नुकताच संपुष्टात आला असून हा करार वाढविण्यासाठी पालिका प्रशासनाने प्रयत्न सुरु केले आहेत. परंतु जागा मालकांनी भाडेवाढ करण्याचा आग्रह धरला आहे तर, महापालिका मात्र आधीच्या दराने भाडे देण्यावर ठाम असल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली. यामुळे प्रकल्प परिचालन आणि देखभालीसाठी ठेकेदार नियुक्त करण्याची प्रक्रीया अंतिम टप्प्यात असतानाच, आता भाडे दरवाढीमुळे हा प्रकल्प पुन्हा अडचणीत येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज १ हजार ५० टन कचरा निर्माण होतो. त्यापैकी १२५ टन कचऱ्यावर विविध प्रकल्पांतर्गत शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून त्यापासून खतनिर्मिती केली जाते. उर्वरित सुमारे ६०० टन ओला कचरा दिवा कचराभूमीवर टाकला जात होता. या कचराभूमीत आग लागण्याचे प्रकार घडत असून यामुळे परिसरात सर्वत्र धुर पसरत आहे. कचराभुमीमुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. या त्रासामुळे दिवावासिया हैराण झाले आहेत. या समस्येतून सुटका करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून शहराबाहेर म्हणजेच भांडार्ली गावात शास्त्रोक्त पद्धतीने कचरा विल्हेवाटीचा प्रकल्प उभारण्यात आला आहे.

Farmers, Farmers news,
प्रकल्प घोषणेपूर्वी शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे
illegal constructions thane marathi news
ठाण्यात बेकायदा बांधकामांवर १५ एप्रिलपासून कारवाई, ठाणे महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आदेश
The district administration announced the list of campaign materials along with food items in the list fixed to account for Lok Sabha election expenses pune
जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्यात आणली ‘स्वस्ताई’; जाणून घ्या कशी?
12 different products in maharastra received gi tags
तुळजापूरच्या कवड्याच्या माळेसह कोणत्या उत्पादनांना मिळाले जीआय मानांकन? जाणून घ्या सविस्तर…

हेही वाचा >>> ठाकरे गटाचे राजन विचारे यांचा गौप्यस्फोट, म्हणाले “नरेश म्हस्केंचा काँग्रेस पक्ष प्रवेश…”

या प्रकल्पाकरिता भाडे तत्वावर जमीन घेण्यात आली असून त्यासाठी दरमहा २० लाख रुपये भाडे देण्यात येत आहे. परंतु या प्रकल्पाचे परिचालन आणि देखभालीसाठी ठेकेदार नियुक्त करण्यासंबंधीच्या काढलेल्या निविदेला नऊ वेळा मुदतवाढ देऊनही प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे हा प्रकल्प सुरु होऊ शकलेला नाही. या कामासाठी नव्याने काढण्यात आलेल्या निविदेला ठेकेदारांनी प्रतिसाद दिला असून ठेकेदार निवडीची प्रक्रीया अंतिम टप्प्यात आहे. कोकण शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या आचार संहितेमुळे ही प्रक्रीया रखडलेली आहे.

हेही वाचा >>> “पक्षावर दबाव आणण्यासाठी कट…”, नरेश मस्केंचा राजन विचारेंवर गंभीर आरोप

अत्यावश्यक सेवा असल्यामुळे निविदा अंतिम करण्यासाठी राज्य शासनाला पालिका पत्र पाठविणार असून शासनाकडून ही मागणी मान्य होईल, असे पालिका प्रशासनाला आशा आहे. असे असतानाच, कचरा प्रकल्पासाठी भाडे तत्वावर घेण्यात आलेल्या जागेचा करार नुकताच संपुष्टात आला असून हा करार वाढविण्यासाठी पालिका प्रशासनाने प्रयत्न सुरु केले आहेत. परंतु जागा मालकांनी भाडेवाढ करण्याचा आग्रह धरला आहे तर, महापालिका मात्र आधीच्या दराने भाडे देण्यावर ठाम असल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली.

भंडार्ली येथे कचरा विल्हेवाटीसाठी महापालिकेने सुमारे १० एकर इतकी खासगी जागा भाडेतत्त्वावर घेतली आहे. या जागेसाठी ५ रुपये ५० पैसे या दराने म्हणजेच महिन्याला २० लाख रुपये इतके भाडे जागा मालकांना देत आहे. परंतु जागेचा भाडे करार वाढविताना भाडेवाढ करण्याची मागणी मालकांनी केली असून मालकांनी ५ रुपये ५० पैसे या दराऐवजी ८ रुपये दराने भाडे देण्याचा आग्रह धरला आहे, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली. या संदर्भात पालिकेचा एकही वरिष्ठ अधिकारी माहिती देण्यास तयार नाही.