ठाणे : मुस्लिम धर्मियांनी बकरी ईद गुरुवारी आणि शुक्रवारी साजरा केला. दोन दिवसांत भिवंडी महापालिका क्षेत्रात सात हजाराहून अधिक जनावरांची कुर्बानी देण्यात आली. जनावरांच्या कुर्बानीसाठी केंद्रांवर शुल्क निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार महापालिकेला सुमारे १५ लाखाहून अधिक रुपयांची शुल्क वसूली झाली अशी माहिती भिवंडी महापालिकेने दिली.
भिवंडी महापालिका क्षेत्रात मोठ्याप्रमाणात मुस्लिम धर्मीय वास्तव्यास आहेत. मुस्लिम धर्मियांकडून बकरी ईद सण साजरा केला जात आहे. या दरम्यान जनावरांची कुर्बानी देण्यात येते. भिवंडी महापालिकेने कुर्बानीसाठी तात्पुरती केंद्रे निश्चित केली होती. त्यानुसार पहिल्याच दिवशी म्हणजे, गुरुवारी ५ हजार ८११ जनावरांची कुर्बानी या केंद्रांमध्ये देण्यात आली. तर दुसऱ्या दिवशी १ हजार ७२५ जनवारांची कुर्बानी देण्यात आली. दोन दिवसांमध्ये ७ हजार ६१६ जनावरांची कुर्बानी झाली. याद्वारे १५ लाख ११ हजार २०० रुपयांचे शुल्क वसूल झाले. कुर्बानी झाल्यानंतर केंद्रे पाण्याने धुवून तेथे औषध फवारणी करुन जागा स्वच्छ केली जात असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
प्रभाग – जनावरांची कुर्बानी
१- २५९०
२- १५५६
३- ४८१
४- १६५३
५- १३३६
एकूण – ७६१६
