ठाणे : भिवंडी येथे स्टेम प्राधिकरणाकडून पावसाळ्यापूर्वीच्या दैनंदिन देखभाल दुरुस्तीची कामे केली जाणार आहे. त्यामुळे स्टेम प्राधिकरणाकडून भिवंडी शहरातील काही भागात बुधवारी (८ एप्रिल) ते गुरुवारी (९ एप्रिल) सकाळी ९ वाजेपर्यंत २४ तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
भिवंडी शहरातील ममता टाकी, चार्विद्रा गाव, पटेलनगर, बाला कंपाऊन्ड, फरीदबाग, बारक्या कंपाऊन्ड, संगमपाडा, कचेरीपाडा, ब्राम्हणआळी, कसारआळी, भावेनगर, कोंबडपाडा, आदर्शपार्क, अजयनगर, नझराना कंपाऊन्ड, गोकुळनगर, इंदिरानगर, कल्याणरोड, ठाणगेआळी, तीनबत्ती, शिवाजीनगर स्टाफ क्वॉटर्स, खडकरोड, गुरुचरणपाडा, अजमेरनगर, पटेल कंपा., शमानगर, साईनाथ सोसायटी, अंजूरफाटा, देवजीनगर, नारपोली, विठ्ठलनगर, सोनीबाई, कंपाऊन्ड, खलीक कंपाउन्ड, फैजान कंपाऊन्ड, मेहता कंपाऊन्ड, रोशनबाग, देऊनगर टावरे कंपाउन्ड, भंडारी कंपाऊन्ड, नारपोली गाव, देवजीनगर, आय.जी.एम. पाण्याची टाकी, निजामपूरा, इस्लामपुरा, आमपाडा, अवचितपाडा, म्हाडा कॉलनी, शास्त्रीनगर, नेहरूनगर, मिल्लतनगर १,२,३, नविवस्ती, कोंडाजीवाडी, चव्हाण कॉलनी, वेताळपाडा, बाळा कंपाऊन्ड, खंडूपाडा, अंसार मोहल्ला, डोलारे पेट्रोलपंप, खोका कंपाऊन्ड, कामतघर, अंजूरफाटा, जूनी ताडाली, नवी ताडाली, भाग्यनगर, हनूमान नगर, जयअंबे सोसायटी, कमला हॉटेल परीसर, श्रीरंग सोसायटी, गणेश सिनेमा, नवजीवन कॉलनी, समदनगर, कणेरी, न्यु कणेरी, गौरीपाडा, पद्यानगर, अशोकनगर, घुंघटनगर, कोटरगेट, बरफ गल्ली, कापआळी, इस्लामपूरा, उर्दरोड, कुरेशनगर, लाहोटी कंपाऊन्ड, भादवड, टेमघर या भागातील पाणी पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे अशी माहिती भिवंडी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिली.
