ठाणे : भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका क्षेत्रात स्टेम प्राधिकरणामार्फत टेमघर जलशुद्धीकरण केंद्रातील केबल दुरुस्ती आणि जलवाहिनी गळती दुरुस्तीची तातडीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. या कामांमुळे स्टेम प्राधिकरणाकडून भिवंडी शहराला होणारा पाणी पुरवठा उद्या, बुधवारी २४ तासांसाठी बंद राहणार आहे. या बंदनंतरही एक दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती महापालिकेने दिली असून यामुळे भिवंडीकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत.

भिवंडी महापालिका क्षेत्रात तीन स्त्रोतांमार्फत दररोज १२० दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यापैकी स्टेम प्राधिकरणाकडून ७३ दशलक्षलीटर, मुंबई महापालिकेडून ४२ दशलक्षलीटर आणि वऱ्हाळदेवी तलाव पाणी योजनेतून ५ दशलक्षलीटर इतके पाणी पुरवठा करण्यात येतो. हे तिन्ही स्त्रोत शहरातील पाणी पुरवठ्यासाठी महत्वाचे मानले जातात. यापैकी प्रदुषणाच्या कारणास्तव वऱ्हाळदेवी तलावातून उपलब्ध होणारा पाणी पुरवठा थांबविण्यात आला आहे. असे असतानाच आता दुरुस्ती कामासाठी स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

पाणी कधी नाही

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका क्षेत्रात स्टेम प्राधिकरणामार्फत टेमघर जलशुद्धीकरण केंद्रातील केबल दुरुस्ती आणि जलवाहिनी गळती दुरुस्तीची तातडीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. या कामांमुळे बुधवार १३ मे रोजी सकाळी ९ वाजल्यापासून गुरुवार १४ मे सकाळी ९ वाजेपर्यंत २४ तासांसाठी शहराला होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. या बंदनंतरही एक दिवस कमी दाबाने आणि कमी प्रमाणात पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संदिप पटणावर यांनी दिली.

शहराच्या ‘या’ भागात पाणी नाहीममता टाकी, चाविंद्रा गांव, पटेल नगर, बाला कंपाऊन्ड, फरीदबाग, बारक्या कंपाऊन्ड, संगमपाडा, कचेरीपाडा, ब्राम्हणआळी, कसारआळी, भावेनगर, कोंबडपाडा, आदर्शपार्क, अजयनगर, नझराना कंपा. गोकुळनगर, इंदिरानगर, कल्याणरोड, ठाणगेआळी, तीनबत्ती, शिवाजीनगर स्टाफ क्वॉटर्स, खडकरोड, गुरुचरणपाडा, अजमेरनगर, पटेल कंपा., शमानगर, साईनाथ सोसायटी, अंजूरफाटा, देवजीनगर, नारपोली, विठ्ठलनगर, सोनीबाई, कंपा., खलीक कंपाउन्ड, फैजान कंपा., मेहता कंपाउन्ड, रोशनबाग, देऊनगर टावरे कंपाउन्ड, भंडारी कंपाउन्ड, नारपोली गांव, देवजीनगर, आय.जी.एम. पाण्याची टाकी, निजामपूरा,

इस्लामपुरा, आमपाडा, अवचितपाडा, म्हाडा कॉलनी, शास्रीनगर, नेहरूनगर, मिल्लतनगर १,२,३, नविवस्ती, कोंडाजीवाडी, चव्हाणकॉलनी, वेताळपाडा, बाळा कंपाउन्ड, खंडूपाडा, अंसार मोहल्ला, डोलारे पेट्रोलपंप, खोका कंपाउन्ड, कामतघर, अंजूरफाटा, जूनी ताडाली, नवी ताडाली, भाग्यनगर, हनूमान नगर, जयअंबे सोसायटी, कमला हॉटेल परीसर, श्रीरंग सोसायटी, गणेश सिनेमा, नवजीवन कॉलनी, समदनगर, कणेरी, न्यु कणेरी, गौरीपाडा, पद्यानगर, अशोकनगर, घुंघटनगर, कोटरगेट, बरफ गल्ली, कापआळी, इस्लामपूरा, उर्दरोड, कुरेशनगर, लाहोटी कंपाउन्ड, भादवड, टेमघर या भागांचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.