डोंबिवली : डोंबिवली म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बालेकिल्ला. उच्चशिक्षित कट्टर संघ स्वयंसेवकांचे ठिकाण म्हणजे डोंबिवली. अशा वर्तुळात रवींद्र चव्हाण यांना सहजासहजी प्रवेश मिळणे कठीणच होते. मात्र सुरुवातीला ‘हरकाम्या’ कार्यकर्ता, नंतर आक्रमक तरुण, त्यानंतर ‘कार्य’तत्पर नगरसेवक, त्यानंतर सांस्कृतिक कामांना आर्थिक पाठबळ देणारा नेता आणि नंतर भाजपच्या राज्यातील मुख्य नेत्यांचा निकटवर्तीय असा प्रवास करत रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या कार्याध्यक्षपदावर पकड मिळवली. अलीकडे यशवंतराव चव्हाण विद्यापीठाची दूरस्थ शिक्षण विभागाची पदवी जवळ घेतली असली, तरी रवींद्र चव्हाण यांचे सुरुवातीचे शिक्षण बारावीपर्यंतचे. नोकरी, व्यवसाय नसल्याने सुरुवातीच्या काळात गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या मंडळींमध्ये ऊठबस. त्यातून काही गुन्हेही दाखल झाले. पण कालांतराने ते पुसूनही निघाले…
साधारण २५ वर्षांपूर्वी भाजपमध्ये सामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांनी काम सुरू केले. त्यावेळच्या शिस्तप्रिय आणि तत्त्वनिष्ठ भाजपच्या मंडळींमध्ये आक्रमक आणि समर्पित कार्यकर्ता म्हणून् ते पुढे येऊ लागले. त्यावेळी विनोद तावडे यांच्यासारख्या राज्यस्तरीय नेते मंडळींनी चव्हाण यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि सुरुवातीला नाके मुरडणारी मंडळीही झुकू लागली. त्यामुळे संघ, भाजपनिष्ठांचा प्रभाग असलेल्या सावरकर रोडमधून ते नगरसेवक बनले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा