भाजपाचे आमदार तथा माजी मंत्री गणेश नाईक यांचा अटकपूर्व जामीन अर्ज शनिवारी ठाणे न्यायालयाने फेटाळला. गणेश नाईक यांच्याविरोधात एका महिलेवर लैंगिक अत्याचार आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळल्याने त्यांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे.

नवी मुंबई येथील ऐरोली विधानसभेतील भाजपचे आमदार यांच्याविरोधात एका महिलेने धमकी आणि लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर धमकी प्रकरणी सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात तर लैंगिक अत्याचार प्रकरणी नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे या प्रकरणांत गणेश नाईक यांनी ठाणे न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर बुधवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. के. ब्रह्मे यांच्या न्यायालयात सुनावणी घेण्यात आली होती.

bombay high court, nagpur bench Judges, cast vote, queue
उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मतदानासाठी रांगेत…
kejriwal arrest
न्यायालयांचा केजरीवाल यांना पुन्हा धक्का; तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार ?
Supreme Court Grants Conditional Bail to former professor Shoma Sen in Bhima Koregaon Case
भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी शोमा सेन यांना सर्वोच्च न्यायालयाने दिला जामीन, या अटी घातल्या…
Rashmi Barve
रश्मी बर्वे प्रकरणावर बुधवारी सुनावणी, जातवैधता प्रमाणपत्रामुळे निवडणूक अर्ज रद्द

नेमकं काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर

नाईक यांच्या विरोधकांच्या दबावामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा युक्तीवाद गणेश नाईक यांच्या वकिलांनी केला होता. तर गणेश नाईक यांच्यावर दाखल असलेले गुन्हे गंभीर स्वरूपातील आहे. त्यामुळे त्यांची कोठडी मिळणे आवश्यक असल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला होता. दोन्ही बाजूंकडील युक्तिवाद ऐकल्यानंतर अर्जावरील निकाल शनिवारी देण्यात आला असून नाईक यांचा जामीनअर्ज फेटाळल्याची माहिती पीडित महिलेच्या वकिलांनी दिली. त्यामुळे गणेश नाईक यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.