ठाणे : एकीकडे भाजपच्या राज्य आणि देश पातळीवरच्या नेत्यांकडून महाराष्ट्रातील मुंबई, उपनगर आणि विशेषतः कोकण विभागावर वर्चस्व आणखी मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शत प्रतिशत भाजपची घोषणा देणाऱ्या भाजपने मात्र कोकण विभागीय शिक्षक मतदारसंघात शिवसेनेच्या ज्ञानेश्वर म्हात्रे यांना उमेदवारी दिली आहे. भाजपावर उमेदवार आयात करण्याची वेळ का आली? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

कोकण विभागीय शिक्षक मतदारसंघ हा एकेकाळी भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. या मतदारसंघावर भाजप आणि संघप्रणित शिक्षक परिषदेचे वर्चस्व होते. त्यामुळे, या मतदारसंघात भाजपाचा विजय कायमच निर्विवाद मानला गेला. मात्र, गेल्या कोकण विभाग शिक्षक मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीत बाळाराम पाटील यांचा विजय झाला. ठाणे जिल्ह्यातील मतांची झालेली विभागणी पाटील यांच्या पथ्यावर पडल्याचे बोलले जाते. त्यानंतर भाजपने या मतदारसंघाच्या बांधणीकडे दुर्लक्ष केले. याच काळात गेल्या निवडणुकीत पराभूत झालेले बदलापूरचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी मतदारसंघात बांधणी केली. शिवसेना प्रणित शिक्षक सेनेच्या माध्यमातून त्यांनी आपला जनसंपर्क सुरूच ठेवला. निश्चित धोरण आणि कार्यक्रम नसल्याने शिक्षकांच्या मतदार नोंदणीकडे दुर्लक्ष झाले. परिणामी गेल्या काही वर्षात भाजपच्या माध्यमातून अवघ्या काही मतदारांची नोंदणी झाल्याची माहिती आहे. त्यामुळे कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपकडे उमेदवारच नसल्याची चर्चा रंगली होती.

sharad pawar
बारामतीमधील नमो रोजगार मेळाव्याच्या निमंत्रणपत्रिकेत शरद पवार यांचे नाव; जिल्हा प्रशासनाकडून सुधारित निमंत्रणपत्रिका
Congress, Tribute, Ashok Chavan, wardha congress committee
अशोक चव्हाण यांना श्रद्धांजली? काँग्रेस कार्यालयात धक्कादायक…
BJP observer MP in gadchiroli
लोकसभेसाठी भाजपचे निरीक्षक गडचिरोलीत, पण चर्चा उमेदवार बदलाची
swabhimani shetkari sanghatana marathi news, manoj jarange patil lok sabha election marathi news
मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढवावी; स्वाभिमानीचा पाठिंबा जाहीर

हेही वाचा – डोंबिवलीत फडके रस्त्यावर अमेरिकन नागरिकाची महिलांकडून फसवणूक

पक्षाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत भाजपच्या नियोजनाचे तीनतेरा वाजल्याची चर्चा होती. त्यानंतर मंत्री रविंद्र चव्हाण यांना या निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली. त्यांचा कल शिवसेनाप्रणित शिक्षक सेनेचे कोकण विभागीय अध्यक्ष असलेल्या ज्ञानेश्वर म्हात्रे यांना उमेदवारी देण्याकडे होता. ऐनवेळी पक्षाच्या एखाद्या कार्यकर्त्याला उमेदवारी देऊन पराभव स्वीकारण्यापेक्षा म्हात्रे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय भाजपने घेतल्याचे कळते आहे.

सोमवारी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ज्ञानेश्वर म्हात्रे हे भाजपचे उमेदवार असतील, अशी घोषणा केली. ते भाजपचे अधिकृत उमेदवार असतील, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समन्वयातून हा उमेदवार दिल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले आहे. ज्ञानेश्वर म्हात्रे स्वतः शिक्षक असून त्यांनी गेल्या निवडणुकीत चांगली मते मिळवली होती. त्यानंतर त्यांनी शिक्षकसेनेच्या माध्यमातून पक्षबांधणी केली. मतदार नोंदणीतही त्यांनी आघाडी घेतल्याने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे बोलले जाते. मात्र, मतदारसंघ ताब्यात असूनही पक्षाचा उमेदवार देऊ न शकल्याने भाजपच्या मर्यादा समोर आल्या आहेत.