करोना महासाथीच्या दोन वर्षाच्या खंडानंतर डोंबिवलीत भाजपतर्फे नमो रमो नवरात्रोत्सवाचे २६ ते ५ सप्टेंबर कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. डोंबिवली एमआयडीसीतील सावळाराम महाराज क्रीडासंकुलाच्या मैदानात हा उत्सव साजरा केला जाणार आहे. नऊ दिवसांच्या काळात अभिनेते, कलाकार, गायक, नृत्य कलाकार नवरात्रोत्सवात हजेरी लावणार आहेत, अशी माहिती आयोजन समितीमधील एक संयोजक दिनेश गोर यांनी दिली.

हेही वाचा- डोंबिवलीत रंगणार सांस्कृतिक रासरंग ; डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून नवरात्रोत्सवाचे आयोजन

Rashmi Thackeray in Thane for Chaitra Navratri festival
ठाण्यात चैत्र नवरात्रौत्सवासाठी रश्मी ठाकरे उपस्थिती… ठाकरे गटाचे शक्तीप्रदर्शन
replica of Ram temple, Ram campaign,
ठाण्यात ठाकरे गटाकडून रामाचा प्रचार, राजन विचारेंच्या चैत्र नवरात्रोत्सवात राम मंदिराची प्रतिकृती
sangeet natak akademi kolhapur marathi news
संगीत नाटक अकादमीच्या वतीने अंबाबाई मंदिरात बुधवार, गुरुवारी ‘शक्ती महोत्सवा’चे आयोजन
Saint Balumamas Rathotsav ceremony ended today with excitement
कोल्हापूर : भंडाऱ्याच्या मुक्त उधळणीत संत बाळुमामांचा रथोत्सव उत्साहात

५० हजार फूट क्षेत्र दांडिया खेळणाऱ्यांसाठी राखीव

२० एकर क्षेत्राच्या सावळाराम महाराज क्रीडासंकुलातील ८० हजार चौरस फुटाच्या मैदानात विद्युत माळांची झकपक, कला दिग्दर्शक संजय धबडे यांनी उभारलेला आकर्षित मंडप, व्यासपीठाच्या चारही बाजुने उभारलेल्या हिंदू मंदिरांच्या भव्य कलाकृती हे या उत्सवाचे वैशिष्ट आहे. ५० हजार फूट क्षेत्र दांडिया खेळणाऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. उत्सवासाठी येणाऱ्यांना वाहने ठेवण्यासाठी वाहनतळाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. मुसळधार पाऊस आला तरी त्याला तोंड देईल अशी भक्कम मंडप उभारणी करण्यात आली आहे. नवरोत्रात्सात दांडिया खेळण्यासाठी येणाऱ्या तरुण, तरुणी, महिला, पुरूष यांनी ‘नमोरमो.रमजत’ याठिकाणी नोंदणी करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे, असे संयोजक गोर यांनी सांगितले.

हेही वाचा- विश्लेषण : नवी मुंबई, ठाण्यापाठोपाठ डोंबिवलीतही? सॅटीस प्रकल्प का ठरतेय गरज आणि अडचणही?

मराठी, हिंदी, गुजराती कलाकारांचा सहभाग

गुजराती पारंपारिक गीते, लोकगीते, ध्वनीमुद्रित वाद्यावर बसविलेली दांडिया नृत्य हे या नवरात्रोत्सवाचे वैशिष्टय आहे. गरबा नृत्य कलाकार नीलेश गढवी, गायिका तृप्ती गढवी, दांडिया कलाकार नैतिक नागदा, कोशा पंड्या, अंबर देसाई, दिव्या जोशी हे नव्या दमाचे आघाडीतील कलाकार महोत्सवाला उपस्थिती लावणार आहेत. मराठी, हिंदी, गुजराती कलाकार नियमित दांडिया खेळात सहभागी होणार आहेत. यामध्ये गौरी कुलकर्णी, समृध्दी केळकर, अनघा अतुल, साक्षी गांधी, अश्विनी महांगडे, अमेय बर्वे, ज्ञानदा रामतीर्थकर, चेतन वडनेरे, शिवानी सोनार, मनीराज पवार या मराठी कलाकारांचा सहभाग आहे. महाराष्ट्रात ज्याप्रमाणे कोजागिरी साजरी केली जाते. त्याप्रमाणे त्याच पौर्णिमेला गुजरात मध्ये रमजट असते. रमजट हे नमो रमो नवरात्रोत्सवातील विशेष आकर्षण असणार आहे. ८, ९ ऑक्टोबर रोजी ‘नमो रमो रमजट’ साजरा केला जाणार आहे. संध्याकाळी सहा ते रात्री १० वाजेपर्यंत दांडिया खेळला जाणार आहे.

मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाची आखणी

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे. नमो रमो नवरात्रोत्सव आणि रमजट सोहळ्यामध्ये भाविकांना मोफत प्रवेश देण्यात येणार आहे. मोफत प्रवेशिका नमोरमो.रजमजत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. या प्रवेशिका आपल्या मोबाईलवर स्थापित करुन घेण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.