ठाणे : मोदी सरकारने नऊ वर्षात राबविलेल्या विविध योजना प्रचार करण्याच्या उद्देशातून भाजपने आज, रविवारी ठाणे लोकसभा मतदार संघात मेळावा आयोजत केला आहे. यानिमित्ताने भाजपकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजते. डोंबिवलीतील युती वादाच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याचे महत्व वाढले असून या मेळाव्यात भाजपचे नेते पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भाजपचे पदाधिकारी नंदू जोशी यांच्यावर विनयभंगचा गुन्हा दाखल झाल्यानंतर शिंदेची शिवसेना आणि भाजप च्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमधील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. यातूनच ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदार संघात कोणाचा उमेदवार असेल, यावरून शिंदेची शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांकडून दावे केले जात आहेत. युतीच्या स्थानिक नेत्यांमध्ये वाद रंगला असतानाच, ठाणे लोकसभा मतदार संघामध्ये भाजपने आज, रविवारी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण या तीन मंत्र्यांच्या उपस्थितीत मेळावा आयोजित केला आहे. त्यामुळे डोंबिवलीतील युती वादाच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याचे महत्व वाढले आहे.

Campaigning by BJP outside the polling station Congress complaint to the Commission
मतदान केंद्राबाहेरच भाजपकडून प्रचार; प्रशासन बघ्याच्या भूमिकेत, काँग्रेसची आयोगाकडे तक्रार
Pankaja Munde, Pankaja Munde campaign rally,
पंकजा मुंडेंच्या प्रचार मेळाव्यात पक्षांतर्गत गटबाजीचे दर्शन, आमदार मुंदडा अनुपस्थित
jalgaon voter awareness marathi news, jalgaon voter id marathi news
तुमचे गाव, सोसायटीला सुवर्ण, रौप्य, कांस्य यांपैकी कोणता फलक हवा ? मतदान टक्केवारी वाढीसाठी प्रशासनाचा अनोखा उपक्रम
Dindori, Sharad Pawar
दिंडोरीतून मार्क्सवाद्यांच्या माघारीने शरद पवार गटाला बळ

या मेळाव्याला ठाणे लोकसभा मतदारसंघातील सर्वच्या सर्व सहा विधानसभा मतदारसंघातील भाजपा पदाधिकाऱ्यांबरोबरच बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याला आमदार संजय केळकर, आमदार गणेश नाईक, भाजपा प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, माजी खासदार विनय सहस्रबुद्धे यांच्याकडून प्रमुख मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या मेळाव्यात भाजपचे नेते उपस्थित पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्याशी आगामी निवडणुकीबाबत चर्चा करणार असल्याचे समजते. डोंबिवलीमधील नंदू जोशी प्रकरणामुळे जिल्ह्यातील भाजपचे अनेक पदाधिकारी तसेच कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. यामुळे मेळाव्यात डोंबिवलीतील युती वादाचे पडसाद पदाधिकाऱ्यांकडून उमटण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. केंद्र सरकारने गेल्या नऊ वर्षात राबविलेल्या विविध योजनांचा प्रसार प्रत्येक कुटुंबापर्यंत करण्याचा भाजपाने निर्धार केला आहे. त्यानुसार घराघरात संपर्काची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याचबरोबर प्रत्येक लोकसभा मतदारसंघात मेळावा भरविण्यात येत आहे. त्यानुसार ठाणे लोकसभेचा मेळावा डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात रविवारी सकाळी १० वाजता होणार आहे.