Premium

उल्हासनगरच्या सेंच्युरी रेयॉन कंपनीत स्फोट; चार ते पाच कामगार अत्यवस्थ, दोघांची स्थिती चिंताजनक

उल्हासनगर शहरात शहाड भागात असलेल्या सेंच्युरी रेयॉन या कंपनीत शनिवारी सकाळच्या सुमारास भीषण स्फोट झाला.

century rayon, ulhasnager, Blast at Century Rayon Company in Ulhasnagar
उल्हासनगरच्या सेंच्युरी रेयॉन कंपनीत स्फोट; चार ते पाच कामगार अत्यवस्थ, दोघांची स्थिती चिंताजनक

उल्हासनगर: उल्हासनगर शहरात शहाड भागात असलेल्या सेंच्युरी रेयॉन या कंपनीत शनिवारी सकाळच्या सुमारास भीषण स्फोट झाला. या भीषण स्फोटात पाच ते सहा जण गंभीर जखमी झाले असून दोन अत्यवस्थ असल्याची माहिती मिळते आहे. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. कंपनी प्रशासनाने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र जखमींना शेजारच्याच कंपनीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर शहाड येथील सेंच्युरी रेयॉन कंपनीत सकाळच्या सुमारास भीषण स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता इतकी होती की बिर्ला गेट चौक शहाड गावठाण परिसरात घरांना हादरे बसले. कंपनीच्या सी एस दोन या विभागात स्फोट झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली आहे. स्फोटानंतर जखमी कामगारांना तातडीने शेजारच्याच कंपनीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी दोन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती कामगारांनी दिली. कंपनी प्रशासनाने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. घटनेची माहिती मिळतात उल्हासनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्या पाठोपाठ स्थानिक आमदार कुमार आयलानी, माजी आमदार पप्पू कलानी यांच्यासह स्थानिक नागरिकांनी रुग्णालयात गर्दी केली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Blast at century rayon company in ulhasnagar amy

First published on: 23-09-2023 at 14:05 IST
Next Story
विश्लेषण : कल्याण-कसारा तिसऱ्या मार्गिकेची प्रतीक्षा केव्हा पूर्ण होणार?