कल्याण डोंबिवली पालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठीची अंतीम प्रभाग रचना शुक्रवारी शासन निर्देशानुसार पालिका निवडणूक अधिकारी उपायु्क्त सुधाकर जगताप यांनी जाहीर केली. बहुसदस्य प्रभाग पध्दतीत एकूण ४४ प्रभाग असणार आहेत. तीन सदस्य गटाचे ४३ आणि दोन सदस्य गटाचा एक प्रभाग असणार आहे, अशी माहिती पालिका निवडणूक अधिकारी जगताप यांनी दिली.

कल्याण पूर्व, पश्चिमेतील सात प्रभागांच्या सीमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. काळा तलाव, ठाणकरपाडा, सिध्देश्वर आळी, जोशीबाग, रामबाग सिंडिकेट, लोकग्राम, नेतिवली मेट्रोमाॅल या प्रभागांचा त्यात समावेश आहे. नवरचित बहुसदस्य प्रभाग पध्दतीमधील प्रभाग रचनेवर एकूण ९९७ लोकांनी हरकती नोंदवल्या होत्या. यामधील ३७५ हरकती मान्य करण्यात आल्या. प्रभाग नावातील बदल, सीमेवरील इमारतीचे ठिकाण असे किरकोळ बदल सूचविणाऱ्या हरकती मान्य करण्यात आल्याचे सूत्राने सांगितले.
महासाथीमुळे २०२१ मध्ये जनगणना झाली नाही. त्यामुळे २०११ च्या जनगणनेच्या लोकसंख्या निकषांवर आगामी निवडणूक घेण्यात येणार आहे. यापूर्वीच्या जनगणनेप्रमाणे १५ लाख १८ हजार ७६२ लोकसंख्या कल्याण डोंबिवलीची आहे. या लोकसंख्येतून १३३ नगरसेवक निवडून द्याचे आहेत. यापूर्वी ही संख्या १२२ होती. शहरातील अनुसूचित जातीची लोकसंख्या एक लाख ५० हजार १७१ आहे. या लोकसंख्येसाठी १३ जागा राखीव आहेत. यामधील सात जागा महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जमातीची लोकसंख्या ४२ हजार ५८४ आहे. अनुसूचित जमातीसाठी चार जागा राखीव आहेत. दोन जागा महिलांसाठी राखीव असतील, असे उपायुक्त जगताप यांनी सांगितले.

narendra modi
पंतप्रधानांकडून प्रचारात जुनेच मुद्दे; विरोधकांची टीका, मित्रपक्षांचीही भिस्त मोदींवरच
An account of the work done in 10 years is presented in BJP resolution
‘मोदी की गॅरंटी’चा जाहीरनाम्यात पुनरुच्चार; भाजपच्या ‘संकल्पपत्रा’त १० वर्षांतील कामांचा लेखाजोखा सादर
Lok Sabha polls West Bengal elections
ममतादीदी आणि भाजपा आमनेसामने; एनआयएवरील हल्ल्याचं नेमकं प्रकरण काय?
Dindori, Sharad Pawar
दिंडोरीतून मार्क्सवाद्यांच्या माघारीने शरद पवार गटाला बळ

सर्वसाधारण गटातील महिलांसाठी ५८ जागा राखीव आहेत. उर्वरित ५८ जागा सर्वसाधारण गटासाठी आहेत. पालिका मुख्यालय, प्रभाग कार्यालयांच्या सूचना फलकांवर, पालिका संकेतस्थळांवर अंतीम प्रभाग रचना प्रसिध्द करण्यात आली आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.