Premium

कल्याणमध्ये चारित्र्याच्या संशयावरुन प्रेयसीची हत्या; प्रियकरास अटक

याप्रकरणी पोलिसांनी विजय जाधव (४८) याला अटक केली आहे.

Boyfriend arrested, case, murdeing girlfriend, suspicion character kalyan
कल्याणमध्ये चारित्र्याच्या संशयावरुन प्रेयसीची हत्या; प्रियकरास अटक (छायाचित्र- लोकसत्ता टीम)

कल्याण: येथील पूर्व भागातील विजयनगर आमराई भागात शुक्र‌वारी सकाळी एका तरुणाने प्रेयसीच्या चारित्र्यावर संशय घेऊन धारदार शस्त्राने तिची हत्या केली. हे दोघेही एकत्रित राहत होते. त्याच घरातच त्याने ही हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रसिका कोलंबेकर (३६) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. तिच्या हत्येप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी विजय जाधव (४८) याला अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले, विजय आणि रसिका मागील काही महिन्यांपासून विजय आमराई भागातील एका सोसायटीत एकत्र राहत होते. काही दिवसांपासून विजय हा रसिकाच्या चारित्र्यावर सारखा संशय घेत होता. असे काहीच नसल्याचे ती त्याला सांगत होती. त्यावर विजयचा विश्वास नव्हता.

हेही वाचा… आरोग्य केंद्रांना जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यरात्री भेटी; सर्व सुविधा सज्ज ठेवण्याचे सक्तीचे आदेश

यावरून रसिका आणि विजय यांच्यात दररोज वाद होत होते. शुक्रवारी सकाळी त्यांच्यात नेहमीप्रमाणे वाद झाला. यावेळी संतापलेल्या विजयने घरातील धारदार शस्त्राने रसिकावर वार केले. तिला गंभीर जखमी केले. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. परिसरातील नागरिकांनी ही माहिती कोळसेवाडी पोलिसांना दिली. पोलीस तात्काळ घटनास्थळी येऊन विजयला ताब्यात घेतले. रसिकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Boyfriend arrested in a case of murdering his girlfriend due to suspicion of character dvr

First published on: 06-10-2023 at 18:23 IST

आजचा ई-पेपर : ठाणे

वाचा