scorecardresearch

चार्जर घेतला म्हणून भावाने केला चाकू हल्ला

मोबाईलला चार्जिंग करण्यासाठी चार्जर घेतला म्हणून ३८ वर्षीय व्यक्तीने त्याच्या थोरल्या भावावर चाकू हल्ला केल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला आहे.

चार्जर घेतला म्हणून भावाने केला चाकू हल्ला
संग्रहित छायाचित्र

ठाणे : मोबाईलला चार्जिंग करण्यासाठी चार्जर घेतला म्हणून ३८ वर्षीय व्यक्तीने त्याच्या थोरल्या भावावर चाकू हल्ला केल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला आहे. याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वागळे इस्टेट येथे ३८ वर्षीय तरूण हा त्याचे आई-वडील आणि थोरल्या भावासोबत राहतो. शनिवारी त्याचा भाऊ चार्जर घेऊन मोबाईल चार्जिंग करत होता. याचा राग आल्याने दोघांमध्ये वाद झाले. त्यानंतर तरूण घरातून बाहेर पडला. तो पुन्हा घरी आला असता त्याच्या हातामध्ये चाकू होता. त्याने भावाच्या पोटाजवळ चाकूने दोन वार केले. सुदैवाने आई-वडिलांनी अडविल्याने जखमी तरूणाचा जीव वाचला आहे. याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Brother attacked knife charger mobile charging police filed case ysh

ताज्या बातम्या