scorecardresearch

कल्याण : अनेकदा समज देऊनही शेजारी राहणारा रिक्षावाला वहिनीच्या बेडरुममध्ये डोकवायचा; दिराने केला खून

कल्याणमध्ये वारंवार खिडकीतून लोकांच्या बेडरूममध्ये डोकावणे एका रिक्षा चालकाला महागात पडले आहे. पीडित महिलेच्या दिराने रिक्षा चालकाचा खून केलाय.

कल्याण : अनेकदा समज देऊनही शेजारी राहणारा रिक्षावाला वहिनीच्या बेडरुममध्ये डोकवायचा; दिराने केला खून

कल्याणमध्ये वारंवार खिडकीतून लोकांच्या बेडरूममध्ये डोकावणे एका रिक्षा चालकाला महागात पडले आहे. कल्याणमधील उंबर्डे गावात झालेल्या हत्या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी सोपान पंजे नावाच्या युवकाला अटक केली आहे. त्याने रिक्षा चालक अभिमान भंडारी याची धारदार शस्त्राने हत्या केली होती. अभिमान दररोज पहाटे सोपान याच्या वहिनीच्या बेडरुमच्या खिडकीतून डोकावून पाहता होता. त्याला वारंवार समजावले. यानंतर देखील तो ऐकत नसल्याने सोपान याने अभिमान याची हत्या केल्याची कबूली दिली आहे.

कल्याण पश्चिमेत उंबर्डे गावात ३ दिवसांपूर्वी रिक्षा चालक अभिमान भंडारी याची पहाटेच्या सुमारास धारदार शस्त्रने हत्या करण्यात आली होती. अभिमान याच्या हत्येनंतर एकच खळबळ उडाली होती. खडकपाडा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला. डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी उमेश माने पाटील, वरिष्ठ पोलीस निरिक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी २४ तासांच्या आत या प्रकरणाचा छडा लावला.

रात्रीच्या वेळी लोकांच्या बेडरुमध्ये डोकावण्याची विकृती

या प्रकरणात पोलिसांनी सखोल तपास करीत अभिमान याची हत्या करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतले. आरोपीच्या अटकेनंतर जी माहिती समोर आली ती अतिशय धक्कादायक आहे. अभिमानच्या विकृतीमुळेच त्याचा अंत झाल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा : यवतमाळमध्ये पतीनेच रचला पत्नीच्या खुनाचा कट, पुजा कावळे हत्याकांड प्रकरणात ४ आरोपी जेरबंद

अभिमानला रात्रीच्या वेळेत लोकांच्या बेडरुमध्ये डोकावून पाहण्याची वाईट सवय होती. एका रात्री अभिमान वहिनीच्या घरातील खिडकीतून त्यांच्या बेडरुममध्ये डोकावत असल्याचं आरोपी सोपान पंजे याने पाहिलं. यानंतरही दोन-तीन वेळा असा प्रकार घडला. सोपानचा भाऊ एका प्रकरणात जेलमध्ये आहे. वारंवार सांगूनही अभिमान ऐकण्यास तयार नव्हता. अखेर त्याने पुन्हा बेडरूममध्ये डोकावल्यानं सोपानने रागाच्या भरात अभिमानची धारदार शस्त्राने हत्या केली, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक अशोक पवार यांनी दिली.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-11-2021 at 17:16 IST
ताज्या बातम्या