डोंबिवलीत स्कायवाॅकवर सीसीटीव्हीची नजर | CCTV cameras have been installed on the skywalk in Dombivli amy 95 | Loksatta

डोंबिवलीत स्कायवाॅकवर सीसीटीव्हीची नजर

शहरात भुरट्या चोरांचा वावर वाढला आहे. महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून पळून जाणे, हातामधील मोबाईल हिसकावणे.

डोंबिवलीत स्कायवाॅकवर सीसीटीव्हीची नजर
डोंबिवलीत स्कायवॉकवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे

डोंबिवली शहर परिसर, रेल्वे स्थानक भागात भुरट्या चोऱ्या वाढल्यामुळे आणि अनेक वेळा फेरीवाले स्कायवाॅकवर व्यवसाय करत असल्याने त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत डोंबिवली रेल्वे स्थानकातील स्कायवाॅकवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. चोवीस तास स्कायवाॅकवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार असल्याने याठिकाणच्या गैरप्रकारांना आळा बसणार आहे.डोंबिवली शहरात भुरट्या चोरांचा वावर वाढला आहे. महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून पळून जाणे, हातामधील मोबाईल हिसकावणे. सकाळीच कामावर जाण्याच्या गडबडीत असलेल्या प्रवाशांच्या हातामधील मोबाईल हिसकावून पळून जाणे असे प्रकार गेल्या काही दिवसांपासून रेल्वे स्थानक भागात वाढले आहेत. हे गु्न्हे करणाऱ्यांवर नजर असावी आणि त्यांची वेळीच ओळख पटवून त्यांना पकडणे पोलिसांना सोपे जावे म्हणून प्रशासनाने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

हेही वाचा >>> मुंबईतील डाॅक्टरची डोंबिवलीतील स्वस्थम आयुर्वेदच्या संचालकांकडून ८५ लाखाची फसवणूक

अनेक वेळा रात्रीच्या वेळेत भिकारी, गुर्दुल्ले स्कायवाॅकवर निवाऱ्यासाठी येतात. रात्री उशिरा एखादा पादचारी स्कायवाॅकवरुन जात असेल तर त्याला अडवून त्याच्याकडील पैसे, मोबाईल धारदार वस्तुचा दाखवून जबरदस्तीेने खेचून घेतात. अशा गैरप्रकारांवर आळा बसावा. काही वेळा फेरीवाल्यांना हटविणारे पालिका कर्मचारी रात्री नऊ नंतर स्कायवाॅक रेल्वे स्थानक परिसरातून गेले की भाजीपाला विक्रेते आणि इतर फेरीवाले स्कायवाॅकवर येऊन रात्री उशिरापर्यंत व्यवसाय करतात. घरी जाण्यापूर्वी नाशिवंत भाजीपाला, कचरा स्कायवाॅकवर टाकून जातात. या सगळ्या प्रकारांना आळा बसण्यासाठी पालिकेने स्कायवाॅकवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
ठाण्यातील मॅजेस्टिक बुक डेपोच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन

संबंधित बातम्या

ठाणे जिल्हा परिषदेवर प्रथमच भगवा
डोंबिवलीतील १५ बेकायदा इमारतींची ‘रेरा’ नोंदणी ‘महारेरा’कडून रद्द; करोना काळात बँकाँकडून माफियांना सर्वाधिक कर्ज
कल्याण रेल्वे स्थानकाजवळील वाहतूक कोंडीवर उपाय; कल्याण आगारातील बस दुर्गाडी, मुरबाड गणेश घाट येथून सोडण्याचा निर्णय
खाडीकिनारी स्मार्ट डोंबिवली
डोंबिवली : दिवसा खड्डे, रात्री अवजड वाहने एकावेळी रस्त्यावर आल्याने शीळफाटा रस्ता वाहन कोंडीत

व्हिडिओ

ताज्या बातम्या
Padma Bhushan: सुंदर पिचईंना प्रतिष्ठित ‘पद्म भुषण’ प्रदान; म्हणाले, “भारत माझा एक भाग आणि…”
“सुहानाने मला…” शाहरुखने सांगितलं ४ वर्षे कामातून ब्रेक घेण्यामागचं खरं कारण
अलिबाग: सुक्या मासळीचा भाव वाढला; मच्छी विक्रीतून होतेय करोडोंची उलाढाल…
Video: कॉलेजमध्ये बेभान नाचू लागल्या ४ तरुणी; ‘या’ अदा पाहताच नेटकरी झाले फिदा, तुम्हीही पाहा
श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करण्यासाठी कोणत्या हत्यारांचा वापर केला? नार्को चाचणीत आफताबचे धक्कादायक खुलासे