scorecardresearch

कल्याण : भारत जोडायचा की तुटणारी काँग्रेस जोडायची काँग्रेससमोर मोठा पेच ; केंद्रीय मंत्री कपील पाटील यांची टीका

ज्यांनी यापूर्वीच सत्तेत असताना पाकिस्तानाला भारताला जोडणे आवश्यक होते. त्यावेळी त्यांनी अशी कोणतीही कृती केली नाही.

कल्याण : भारत जोडायचा की तुटणारी काँग्रेस जोडायची काँग्रेससमोर मोठा पेच ; केंद्रीय मंत्री कपील पाटील यांची टीका
केंद्रीय मंत्री कपील पाटील

ज्यांनी यापूर्वीच सत्तेत असताना पाकिस्तानाला भारताला जोडणे आवश्यक होते. त्यावेळी त्यांनी अशी कोणतीही कृती केली नाही. याऊलट तोडण्याचीच कामे केली. ते आता अखंड भारत जोडो अभियान राबवून भारताला जोडू पाहत आहेत. भारत देशाला जोडताना यांचा पक्ष तुटत चालला आहे. त्यामुळे काँग्रेसला पहिले आपली तुटणारी काँग्रेस जोडावी लागेल, अशी बोचरी टीका केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपील पाटील यांनी शुक्रवारी येथे केली.
कल्याण मधील दुर्गाडी देवी, नवरात्रोत्सवांच्या दर्शनासाठी केंद्रीय मंत्री पाटील शुक्रवारी रात्री शहरात आले होते. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा >>> कल्याण डोंबिवलीच्या होत असलेल्या बदनामीला वैतागले आमदार राजू पाटील, म्हणाले बाहेरच्यांनी लुडबुड…

एकीकडे काँग्रेसचे भारत जोडो अभियान सुरू आहे त्याच बरोबर दुसरी कडे अध्यक्ष पदावरुन काँग्रेस तुटण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे काँग्रेसला एकावेळी दोन आघाड्यांवर लढावे लागत आहे. ज्या काँग्रेसने यापूर्वीच अखंड भारताचे स्वप्न पूर्ण करणे गरजेचे होते. त्यावेळी त्यांनी तोडण्याची कामे केली. आता अखंड भारताचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सुरू आहे. पाचशे वर्षापूर्वी जो भारत होता, तो अखंड भारत आता पंतप्रधान मोदी यांच्या समर्थ नेतृत्वाखाली आकाराला येत आहे, असे मंत्री पाटील म्हणाले.काँग्रेसमध्ये अध्यक्षपदावरुन जो घोळ सुरू आहे. त्यामुळे काँग्रेसवर आता कोणाचा कंट्रोल राहिला नाही, अशी टीपणी मंत्री कपील पाटील यांनी केली.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या