Premium

ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेचा खोळंबा! वांगणीजवळ इंजिन बंद पडल्याने कल्याण ते कर्जत दरम्यानची लोकल सेवा विस्कळीत

इंजिन बाजूला करण्याचं काम युद्धपातळीवर सुरु करण्यात आलं आहे.

Signal Failure near wangni
कल्याण ते कर्जत लोकल सेवा विस्कळीत (संग्रहित छायाचित्र)

मध्य रेल्वेच्या लोकल सेवेत ऐन गर्दीच्या वेळी बिघाड झाला आहे. त्यामुळे कल्याणहून कर्जतच्या दिशेने जाणारी लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. बदलापूर आणि वांगणी स्टेशनच्या दरम्यान इंजिन बंद पडल्याने लोकल सेवेवर परिणाम झाला आहे. कल्याणहून कर्जतकडे जाणारी लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. इंजिन बाजूला सारण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऑफिस अवर्स संपल्यानंतर यावेळी लोक घरी परतत असतात. त्यामुळे लोकलमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. अशात लोकल सेवेचा खोळंबा झाला आहे. मध्य रेल्वेचं वेळापत्रक बोंबलणार हे आता दिसतंच आहे. लोकल सेवा पूर्ववत करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. एबीपी माझाने या विषयीचं वृत्त दिलं आहे.

बदलापूर आणि वांगणी या दोन मध्य रेल्वे मार्गावर असलेल्या स्टेशन्सच्या दरम्यान इंजिनमध्ये बिघाड झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सुटलेली कर्जत लोकल ही पुढे जाऊ शकलेली नाही. इंजिन कशामुळे बिघडलं हे अद्याप समोर आलेलं नाही. इंजिन बाजूला करण्यासाठी रेल्वेचे प्रयत्न सुरु आहेत.

मुंबई लोकल ही मुंबईकरांची लाईफलाईन आहे. दररोज मुंबई आणि उपनगरांमधून लाखो प्रवासी या लोकलने प्रवास करुन आपल्या कार्यालयापर्यंत पोहचतात. तसंच संध्याकाळ झाली की याच लोकलने घरीही परतत असतात. सकाळी कार्यालयात पोहचण्याची वेळ आणि संध्याकाळी कार्यालयातून घरी परतण्याची वेळ ही मुंबई लोकलसाठी आणि चाकरमान्यांसाठी खूप महत्त्वाची असते. त्यामुळे या वेळेत जर लोकलमध्ये काही बिघाड झाला तर मुंबईकरांचे बरेच हाल होतात, तसाच बिघाड आत्ताही झाला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Central railway disruption during rush hour local services between kalyan and karjat disrupted due to engine failure near wangani scj

First published on: 29-09-2023 at 18:54 IST

आजचा ई-पेपर : ठाणे

वाचा