कल्याण मध्ये दुर्गाडी किल्ल्या जवळ नऊ दिवस वाहतुकीत बदल | Change in traffic for nine days near Durgadi Fort in Kalyan amy 95 | Loksatta

कल्याण मध्ये दुर्गाडी किल्ल्या जवळ नऊ दिवस वाहतुकीत बदल

ठाणे वाहतूक विभागाचे उपायुक्त गणेश गावडे यांनी यासंदर्भात अधिसूचना प्रसिध्द केली आहे

कल्याण मध्ये दुर्गाडी किल्ल्या जवळ नऊ दिवस वाहतुकीत बदल
कल्याण मध्ये दुर्गाडी किल्ल्या जवळ नऊ दिवस वाहतुकीत बदल

कल्याण मधील दुर्गाडी किल्ला येथे नवरात्रोत्सवा निमित्त २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर नऊ दिवस भाविकांची गर्दी होणार असल्याने वाहतूक विभागाने दुर्गाडी किल्ल्या जवळील रस्त्यावर वाहतुकीत बदल केले आहेत. पर्यायी मार्गाने वाहने नेण्याच्या सूचना वाहतूक विभागाने केल्या आहेत.ठाणे वाहतूक विभागाचे उपायुक्त गणेश गावडे यांनी यासंदर्भात अधिसूचना प्रसिध्द केली आहे. शिवाजी चौक कडून लाल चौकी मार्गे भिवंडी दिशेने जाणाऱ्या वाहनांना लाल चौकी येथे अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही वाहने लाल चौकी येथे उजवे वळण घेऊन आधारवाडी चौक, गंधारी पूल, पडघा दिशेने इच्छित स्थळी जातील.

हेही वाचा >>> बाळासाहेबांचे विश्वासू चम्पासिंग थापा उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात

भिवंडीकडून दुर्गाडी किल्ल्या जवळील दुर्गा माता चौक येथून शिवाजी चौक करणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना दुर्गा माता चौक येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही वाहने डावे वळण घेऊन आधारवाडी चौक येथून किंवा लाल चौकी येथून इच्छित स्थळी जातील. कल्याण शिळफाटा दिशेने पत्रीपूल कडून गोविंदवाडी बाह्यवळण रस्त्याने दुर्गाडी किल्ल्याकडे येणाऱ्या लहान वाहनांना संध्याकाळी सहा ते रात्री १२ वाजेपर्यंत प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही वाहने जुना आग्रा रस्ता, वलीपीर रस्ता, गुरुदेव हाॅटेल, शिवाजी चौक, सहजानंद चौक, लाल चौकी मार्गे इच्छित स्थळी जातील. भिवंडीकडून येणारी लहान वाहने दुर्गाडी चौक, लाल चौकी, सहजानंद चौक, शिवाजी चौक, गुरुदेव हाॅटेल, वलीपीर रस्त्याने पत्रीपूल मार्गे इच्छित स्थळी जातील.
रुग्णवाहिका, अग्निशमन, पोलीस इतर अत्यावश्यक सेवेच्या वाहनांना हा नियम लागू नाही, असे उपायुक्त गावडे यांनी स्पष्ट केले आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
बाळासाहेबांचे विश्वासू चम्पासिंग थापा उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात

संबंधित बातम्या

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतील तुला माहीत आहे ना मी हे करू शकत नाही”, जितेंद्र आव्हाडांचं ट्वीट चर्चेत
कल्याण रेल्वे स्थानकाजवळील वाहतूक कोंडीवर उपाय; कल्याण आगारातील बस दुर्गाडी, मुरबाड गणेश घाट येथून सोडण्याचा निर्णय
डोंबिवलीतील १५ बेकायदा इमारतींची ‘रेरा’ नोंदणी ‘महारेरा’कडून रद्द; करोना काळात बँकाँकडून माफियांना सर्वाधिक कर्ज
मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, चौघांचा जागीच मृत्यू
सेल्फी घेत तरुणाचा गळफास

व्हिडिओ

ताज्या बातम्या
‘संस्काराच्या शिदोरीतील उत्तम गुणदर्शन’! पाकिस्तानच्या रावलपिंडी मैदानात जो रूटने असं काही केलं…; Video होतोय तुफान Viral
VIDEO: चेंडू चमकवण्यासाठी जो रुटने लढवली अजब शक्कल; चक्क! ‘जॅक लीचच्या…’
“संजय राऊतांना पिसाळलेल्या कुत्रा चावला आहे,” शिंदे गटातील आमदाराची सडकून टीका
शिंदे गटाच्या आमदाराकडून शिवीगाळ, संजय राऊतांचं प्रत्युत्तर, म्हणाले, “तिथं ते शेपट्या घालत आहेत आणि…”
“तुमच्यापेक्षा दाक्षिणात्य स्टार्स….” चाहत्याला ढकलल्यामुळे हृतिकवर चाहते संतापले; व्हिडीओ व्हायरल