ठाणे : आमदार जितेंद्र आव्हाड यांचे फेसबुक या समाजमाध्यामावर आक्षेपार्ह छायाचित्र प्रसारित केल्याप्रकरणी अनंत करमुसे यांच्याविरोधात वर्तकनगर पोलिसांनी ठाणे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहेत. सुमारे दोन वर्षांपूर्वी करमुसे यांच्याविरोधात वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहेत.

हेही वाचा <<< महाराष्ट्रात झालेल्या फसवणुकीचा सत्तांतराने बदला घेतला; केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची स्पष्टोक्ती

हेही वाचा <<< ठाण्यात रस्त्यांवरील खड्ड्यांच्या संख्येत चारशेने वाढ; शहरात केवळ १६० खड्डेच शिल्लक असल्याचा पालिकेचा दावा

घोडबंदर येथील कावेसर भागात राहणाऱ्या अनंत करमुसे यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह छायाचित्र प्रसारित केले होते. त्यानंतर राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्याने अनंत करमुसे यांच्याविरोधात वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्याआधारे, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर करमुसे यांनीही आपल्याला आव्हाड यांच्या निवासस्थानी त्यांच्या समोर मारहाण झाल्याचा आरोप केला होता. त्यामुळे हे प्रकरण राज्यभर गाजले होते. दरम्यान, मंगळवारी आक्षेपार्ह छायाचित्र प्रसारित केल्याप्रकरणात वर्तकनगर पोलिसांनी करमुसे यांच्याविरोधात ठाणे न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केले आहेत. त्यामुळे करमुसे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.