कल्याण-शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचे, लोकांच्या मनातील सामान्यांचे सरकार राज्यात स्थापन झाले आहे. राज्यातील जनतेला भेटण्यासाठी कार्यक्रमाच्या निमित्ताने जावे लागते. त्यामुळे माझ्या पालकत्व ठाणे जिल्हाकडे थोडे दुर्लक्ष होत असले तरी, ठाणे जिल्हा युतीचा बालेकिल्ला आहे. तो गड राखण्यासाठी भाजप आणि शिवसेनेने (बाळासाहेबांची शिवसेना) एकत्रित प्रयत्न करायचे आहेत, अशी स्पष्टोक्ती देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यातील भाजप-शिंदे समर्थकांमधील कुरबुरींना पूर्ण विराम दिला.

हेही वाचा >>>ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यावर हल्ला

Neelam Gorhe criticize Uddhav Thackeray said he has lost his base politically
“उद्धव ठाकरे यांचा राजकीयदृष्ट्या जनाधार संपला,” निलम गोऱ्हे यांची टीका; म्हणाल्या…
Political Speculation Swirls as Former Minister Ambrishrao Atram Remains Absent from Campaigning in Gadchiroli Chimur
भाजपच्या प्रचारात अम्ब्रीशराव आत्राम यांच्या अनुपस्थितीची चर्चा; मन वळविण्यासाठी वरिष्ठ नेत्यांची मध्यस्थी
dhananjay mahadik statment about shoumika mahadik contesting poll from hatkanangale constituency
हातकणंगलेत शौमिका महाडिक यांच्यासाठी लढण्यास तयार – धनंजय महाडिक
Hemant Godse
अस्वस्थ खासदार हेमंत गोडसे कार्यकर्त्यांसोबत मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी, अन्याय होणार नसल्याची एकनाथ शिंदेंची ग्वाही

भाजप नेते केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर दुसऱ्यांदा कल्याण लोकसभा क्षेत्रातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकांसाठी डोंबिवलीत आल्याने कल्याण लोकसभेवर भाजप दावा ठोकणार की खा. शिंदे यांचाच या मतदारसंघावर हक्क राहणार याविषयी गेल्या वर्षापासून धुसफूस सुरू आहे. या धुसफुसीला केंद्रीय मंत्री ठाकूर येऊन गेल्याच्या दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री शिंदे यांनी पूर्ण विराम दिला. जिल्ह्यासह राज्यातील सर्वच निवडणुका आपणास एकत्रितपणे लढायच्या आहेत, असे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले.

कल्याण डोंबिवली पालिकेतर्फे आयोजित विविध विकास कामांच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री शिंदे कल्याणमध्ये आले होते. केंद्रीय मंत्री कपील पाटील यांनी मुख्यमंत्री शिंदे अलीकडे विविध कार्यक्रम, बैठका, दौऱ्याच्या निमित्ताने सतत व्यस्त असतात. त्यांच्या खासदार मुलाला त्यांच्या भेटीची वेळ घ्यावी लागते. त्यामुळे आमची परिस्थिती काय असेल. तेव्हा आमच्या भिवंडी, शहापूर ग्रामीण भागात येण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांना वेळ मिळेल की नाही याची आम्हाला काळजी आहे.

हेही वाचा >>>ठाणे: जितेंद्र आव्हाडांच्या कुटुंबीयांना संपवण्याचा कट, महापालिका आयुक्तांवरच गंभीर आरोप

मंत्री पाटील यांना प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाणे जिल्हा युतीचा अभेद्य बालेकिल्ला आहे. त्याची तटबंदी राखण्याचे काम भाजप आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेने करायचे आहे. हा गड कायम राखण्याचे काम येथील लोकप्रतिनिधींचे आहे. असे सांगून ठाणे जिल्ह्यात कोणत्याच निवडणुकीत कुरबुरी नसतील आणि तसेच वातावरण आपणास राज्यात निर्माण करायचे आहे, असे सूचित केले.या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री कपील पाटील, खा. डाॅ. श्रीकांत शिंदे, आ. गणपत गायकवाड, माजी आ. नरेंद्र पवार, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे, अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, आ. ज्ञानेश्वर म्हात्रे उपस्थित होते.