उल्हासनगर: उल्हासनगर महापालिकेचा कचरा वाहून नेणाऱ्या एक ट्रकने चीरडल्याने एका सात वर्षीय मुलाला आपला पाय गमवावा लागला आहे. उल्हासनगरच्या कॅम्प पाच भागात गायकवाडपाडा येथे उल्हासनगर पालिकेची कचराभूमी आहे. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर ट्रकची वाहतूक सुरू असते. ही कचराभूमी बंद करावी अशी स्थानिकांची गेल्या अनेक वर्षांपासून मागणी आहे.

उल्हासनगर शहराचा कचरा प्रश्न वर्षानुवर्षे कायम आहे. काही वर्षांपूर्वी उल्हासनगर पालिकेने आपली खेमानी परिसरातील कचरा भूमीची क्षमता संपल्याने कॅम्प पाच भागात खदान परिसरात कचरा टाकण्यास सुरुवात केली होती. या भागात आकाश कॉलनी, गायकवाड पाडा परिसरात लोकवस्ती आहे. सुरुवातीला कचऱ्याची क्षमता कमी असल्याने विशेष त्रास जाणवला नाही. मात्र कालांतराने इतर कचराभूमीप्रमाणे इथेही कचऱ्याला आग लागणे, पावसाळ्यात दुर्गंधी सुटणे आणि यातून दुर्गंधी सांडपाणी वाहण्याचे प्रकार सुरू झाले. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास जाणवू लागला. त्यामुळे ही कचराभूमी बंद करावी अशी मागणी वाढू लागली. या कचरा भूमीचा प्रश्न थेट राष्ट्रीय हरित लवादाकडे पोहोचला. लवादाने त्यावर कारवाईचे आदेशही पालिका प्रशासनाला दिले होते. मात्र ही कचारभुमी बंद होऊ शकली नाही. शनिवारी नियमितपणे या कचरा भूमीवर आलेल्या एका ट्रकने शेजारी खेळत असलेल्या गणेश चव्हाण या सात वर्षीय मुलाला धडक दिली. यावेळी ट्रक या मुलाच्या पायावरून गेला. त्यामुळे या मुलाला पाय गमवावा लागला. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला. चालक शुद्धीवर नव्हता असा आरोप यावेळी नागरिकांनी केला. अपघातानंतर संतप्त नागरिकांनी ट्रक रोखला. तर ही कचरा भूमी बंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

4 crushed to death after sand-laden truck flips
Accident Video : रस्त्याच्या कडेला काम कारणाऱ्या कामगारांवर वाळूने भरलेला ट्रक उलटला! दोन वर्षांच्या चिमुरड्यासह चौघांचा मृत्यू
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Shocking video Young Man Risks His Life By Climbing 30-Ft Hoarding On Highway For Instagram Reel In UP's Saharanpur
“हे सगळं करताना एकदाही आई-वडील आठवत नाहीत?” तरुणानं रीलसाठी अक्षरश: कळस गाठला; VIDEO पाहून थरकाप उडेल
truck vandalism by bikers in pune
दुचाकी नीट चालव म्हटल्याने ट्रकची तोडफोड
pune koyta attack news
पुणे : बिबवेवाडीत तोडफोड करणाऱ्या आरोपीविरुद्ध आणखी एक गु्न्हा, तरुणावर कोयत्याने वार
Crime News
Kolkata Crime : वडिलांच्या प्रेयसीची अल्पवयीन मुलाकडून हत्या, बापाचे विवाहबाह्य संबंध शोधण्यासाठी केला GPS चा वापर
pune two wheeler theft marathi news
पुणे :सिंहगड रस्ता भागात दुचाकी चोरट्यांना पकडले, पाच दुचाकींसह लॅपटॉप जप्त
debt collectors false case news in marathi
जबरी चोरीचा बनाव करणाऱ्या कर्मचाऱ्याला बेड्या

हेही वाचा – कपिल पाटील पुन्हा मंत्री, वामन म्हात्रे महापौर होतील, वन मंत्री गणेश नाईक यांचे भाकीत, नाईकांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

हेही वाचा – राज्याबाहेर एक जरी उद्योग गेला तर मी तुमची काळजी घेईन; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्योग मंत्र्यांना इशारा

आरोग्याचा प्रश्नही गंभीर

गेल्या काही वर्षात या कचरा भूमीमुळे आसपासच्या परिसरात रोगराई पसरण्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत. इथून निघणारी दुर्गंधी, दूर यामुळे श्वसनाचे आजार बळावले आहेत. या कचराभूमीला सातत्याने आग लागते. पालिका प्रशासन ती आग तात्काळ विझवते. मात्र त्यावर कायमस्वरूपी तोडगा निघालेला नाही. पालिकेने ही कचरा भूमी अनधिकृतरित्या तयार केली आहे. नागरी लोकवस्तीच्या शेजारी कचराभूमी तयार करणे चुकीचे असून हा अमानवीय प्रकार असल्याची तक्रार आता नागरिक करत आहेत.

Story img Loader