scorecardresearch

Premium

भिवंडीत बालविवाह रोखला

भिवंडी येथील फुले नगर परिसरात शनिवारी एका अल्पवयीन मुलीचा  विवाह रोखण्यात आला.

भिवंडीत बालविवाह रोखला

ठाणे : भिवंडी येथील फुले नगर परिसरात शनिवारी एका अल्पवयीन मुलीचा  विवाह रोखण्यात आला. मुलीचे वय १४ तर मुलाचे वय सुमारे २१ वर्षे आहे. मुलीच्या आणि मुलाच्या कुटुंबीयांना फुले नगर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर बालविवाह प्रतिबंधात्मक कायद्यानुसार कारवाई केली जाईल, अशी माहिती ठाणे जिल्हा बालसंरक्षण विभागाकडून देण्यात आली. बालविकास प्रकल्प कार्यालय, जिल्हा महिला आणि बालविकास कार्यालय, जिल्हा बालसंरक्षण विभाग, चाइल्ड लाइन आणि फुले नगर पोलीस यांच्या वतीने ही कारवाई करण्यात आली आहे.

 ही चौदा वर्षीय मुलगी तिच्या आई आणि लहान बहिणीसमवेत राहते. मुलीचे कुटुंब हे मूळचे बीड जिल्ह्यातील आहे. तर मुलाचे कुटुंब भिवंडी येथील कामतघर येथे वास्तव्यास आहे.  जिल्हा बालसंरक्षण विभागाला रविवार, १९ डिसेंबर रोजी भिवंडी येथे बालविवाह होणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तेथे लक्ष ठेवण्यात आले होते. कोणालाही माहिती पडू नये म्हणून दोन्ही कुटुंबांकडून मुलीच्या घरातच हा विवाह करण्याचे योजिले होते. मुलीचा शुक्रवारी हळदी समारंभही पार पडला , तर रविवारी घरातच लग्नसोहळा पार पडणार होता. मात्र   पोलिसांनी शनिवारी सायंकाळी ५ वाजता कारवाई केली.

women died lightning Chichala
चंद्रपूर : वीज पडून एक ठार, दोघ जखमी; मूल तालुक्यातील चिचाळा येथील घटना
dagadushet ganapati visarjan
VIDEO: दगडूशेठ गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीने गणेशोत्सवात घालून दिला आदर्श
pune ganesh visarjan 2023, ganesh visarjan started in pune, ganesh visarjan pune 2023 started, pune ganesh idols immersion started, 8000 police force deployed in pune
पुणे : विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ; आठ हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात
dead, Farmer suicide , Devla taluka in nashik ,
नाशिक: देवळा तालुक्यात शेतकऱ्याची आत्महत्या

मुलीच्या पालनपोषणाच्या चिंतेतून…

मुलीला वडील नसल्याने तिचे पालनपोषण कसे होणार तसेच मुलीचे वेळेत लग्न होईल का, या सर्व कारणांमुळे मुलीच्या आईनेच मुलीचा बालविवाह ठरविला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. मुलाच्या कुटुंबीयांनाही मुलीच्या वयाबाबत माहिती असल्याचे समोर आले आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Child marriage stopped police ysh

First published on: 19-12-2021 at 01:19 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×