लोकसत्ता शीर्षकप्रायोजक

गडकिल्ल्यांचा ऐतिहासिक वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी दीपावलीच्या निमित्ताने किल्ल्यांची छायाचित्रे आणि चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
‘लोकसत्ता’ या स्पर्धेचे शीर्षक प्रायोजक आहेत. बनयान माईंड, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, आहाण फाऊंडेशन, मी मुलुंडकर प्रतिष्ठान, श्री ऊर्जा फाऊंडेशन, रोटरी क्लब ठाणे सबर्बन, घंटाळी प्रबोधिनी संस्था या संस्था यासाठी एकत्र आल्या आहेत. ठाणे महापालिका प्रदूषण नियंत्रण कक्ष, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी या कार्यक्रमाला पाठिंबा दिला आहे. गडकिल्ल्यांचे संवर्धन व्हावे आणि त्यांची जपणूक व्हावी, हा या स्पर्धेमागचा उद्देश आहे. विविध किल्ल्यांची काढलेली छायाचित्रे या स्पर्धेत पाठवता येतील. ही स्पर्धा ८ ते १० नोव्हेंबर या कालावधीत ठाण्यातील घंटाळी मैदान येथे होईल. सर्वाना विनामूल्य प्रवेश आहे. ८ नोव्हेंबर रोजी किल्ला बनविणे स्पर्धा घेण्यात येणार आहे. मातीच्या कलाकृती, कंदील बनविणे, दिव्यांना रंग देणे आणि रांगोळी रंग्विणे यासाठी कार्यशाळा दुपारी १२ ते ३ या वेळेत घेण्यात येईल. मराठाकालीन शस्त्रांची प्रात्यक्षिके, किल्ल्यांवर माहितीपर भाषण हे उपक्रमही होतील. ९ नोव्हेंबरला किल्ल्यांचे छायाचित्र आणि चित्रकला स्पर्धा सकाळी १० वाजता घेण्यात येणार आहे. नृत्यकला, भारूड, भाषण, स्वरक्षण कार्यशाळा होईल. १० नोव्हेंबरला बक्षीस वितरण होईल.

documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
MPSC Mantra Increasing Opportunities in Public Service Commission Competitive Exams
MPSC मंत्र: लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा- वाढत्या संधी
juna furniture teaser released by salim khan
ज्येष्ठ नागरिकांचा सहानुभूतीने विचार करायला हवा
CET Cell, Reschedules Entrance Exams, for Third Time, lok sabha 2024, elections, Releases Revised Schedule, marathi news,
विविध प्रवेश परीक्षांच्या वेळापत्रकात पुन्हा बदल, सीईटी सेलकडून सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध