कल्याण-अहमदनगर राज्य महामार्गावर पोटगावनजीक शुक्रवारी रात्री एका चितळाला अज्ञात वाहनाची जोरदार धडक बसली होती. या घटनेत संबंधित चितळ गंभीर जखमी झालं होतं. पणमुरबाडचे नगराध्यक्ष राम दुधळे यांच्यामुळे जखमी चितळाला जीवदान मिळालं आहे. त्यांनी वाहनाची व्यवस्था करून जखमी चितळाला तात्काळ मुरबाड वनविभागाच्या कार्यालयात पोहोचवलं. येथे तातडीने उपचार मिळाल्याने या चितळाचा जीव वाचला आहे. यानंतर शनिवारी अश्वमेध प्रतिष्ठानच्या प्राणी काळजी केंद्रातून या चितळाला सुखरूप जंगलात सोडण्यात आलं आहे.

मुरबाड तालुका आणि परिसरात वनसंपदा मोठ्या प्रमाणावर असल्याने येथे प्राण्यांचा वावरही अनेकदा पाहायला मिळतो. काही दिवसांपूर्वी मुरबाड शहापूर महामार्गावर निल गाईंचा कळप दिसून आला होता. यातील एका नीलगायीने दुचाकीस्वाराला धडक दिल्याने नीलगाय आणि वाहनचालक अशा दोघांचा मृत्यू झाला होता. तर काही महिन्यांपूर्वीपर्यंत मुरबाड आणि अंबरनाथ तालुक्‍यात बिबट्याचा संचार पाहायला मिळाला आहे. त्यामुळे या भागात वन्य प्राणी मार्ग ओलांडतांना अपघाताच्या घटना घडत असतात.

Recovery of installments on Shiv-Panvel highway bus drivers associations statement to Deputy Commissioner of Police
शीव-पनवेल महामार्गावर ‘हप्ते वसुली’, बस चालक संघटनेचे पोलीस उपायुक्तांना निवेदन
heavy traffic on manor wada bhiwandi state highway closed due to crack in bridge near manor
पालघर: मनोर वाडा अवजड वाहतूक बंद; टेन जवळील पुलाच्या सुरक्षिततेबद्दल शंका
seven injured after machinery in trailer
मुंबई नाशिक महामार्गावर ट्रेलर मधील यंत्र वाहनांवर पडून सात जण जखमी
kolhapur marathi news, shaktipeeth expressway marathi news, shaktipeeth expressway kolhapur marathi news
शक्तिपीठ महामार्गाविषयी कोल्हापुरात मंगळवारी जनसुनावणी; शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर दखल

अशीच घटना शुक्रवारी रात्री कल्याण-अहमदनगर रस्त्यावर घडली. कल्याण-अहमदनगर रस्त्यावर पोटगावजवळ एका चितळाला एका अज्ञात वाहनाची जोरदार धडक बसली. रात्रीच्या सुमारास झालेल्या अपघातानंतर चितळ रस्त्याच्याकडेला जखमी अवस्थेत पडलं होतं. या मार्गावरून जाणाऱ्या मुरबाड नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष राम दुधाळे यांना चितळ दिसताच वाहनाची व्यवस्था करून चितळाला मुरबाडच्या वनविभागाच्या कार्यालयात नेलं. येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर चितळ मासले बेलपाडा येथील प्राण्यांच्या उपचार केंद्रात आणलं गेलं.

शनिवारी उप वन संरक्षक तुळशीराम हिरवे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर वनविभागाने या चितळाला सुखरूप जंगलात सोडल्याची माहिती मानद वन्यजीव रक्षक अविनाश हरड यांनी दिली आहे. या भागात असलेली संपदा अपघातग्रस्त होण्यापासून वाचण्यासाठी समृद्धी महामार्गप्रमाणे सर्वच महामार्गाना प्राण्यांसाठी रस्ते बांधण्याची गरज हरड यांनी व्यक्त केली आहे.