सहाय्यक पोलीस आयुक्त पदाची खाकी वर्दी परिधान करून आपण अधिकारी असल्याचे भासवणाऱ्या ४१ वर्षीय भामट्याला चितळसर पोलिसांनी अटक केली आहे. वैभव राऊत असे या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी विविध प्रशासकीय पदांची बनावट ओळखपत्र जप्त केली आहे. याबाबत चितळसर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> डोंबिवली जवळील भोपर गावातील घराला भीषण आग; चार जण होरपळले

वैभव राऊत हा मुंबईतील गिरगाव येथील रहिवासी आहे. वैभव हा सोमवारी घोडबंदर भागातील द सिक्रेट या उपहागृहाजवळ आला. यावेळी त्याने पोलिसांचे मानचिन्ह असलेली सहाय्यक पोलीस आयुक्त पदाची खाकी वर्दी परिधान केली होती. उपहारगृहाच्या व्यवस्थापकाला आपण मुंबई पोलिसात कार्यरत असल्याची त्याने बतावणी केली. तसेच उपहारगृहा बाहेरील गर्दी कमी करा अन्यथा दंड आकारण्यात येईल असेही वैभव याने व्यवस्थापकाला सांगितले. त्याचवेळी तेथे हजर असणारे चितळसर पोलीस ठाण्यात काम करणारे एक पोलीस कर्मचारी यांना याबाबत संशय आला. त्यांनी वैभव यांची अधिक माहिती घेतली असता तो बोगस अधिकारी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तसेच त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे सहायक पोलीस आयुक्त, रेल्वे वरिष्ठ अधिकारी, ठाणे महापालिका पाणी पुरवठा विभाग अधिकारी, विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांसारख्या पदांची बनावट ओळखपत्र आढळून आली. या बनावट ओळखपत्रांच्या आधारे वैभवने कोणाची फसवणूक केली आहे का ? याबाबत चितळसर पोलीस अधिक तपास करत आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chitalsar police has arrested a 41 year old man who pretended to be an officer by wearing police uniform amy
First published on: 01-10-2022 at 16:18 IST