ब्रिटिशांसोबत पोर्तुगीजांनीही विविध देशांमध्ये आपल्या वसाहती निर्माण केल्या. भारतात गोवा, पाँडेचेरी, दीव-दमण, वसई या ठिकाणी पोर्तुगीज वसाहतीच्या खुणा जागोजागी आढळतात. या ठिकाणी पोर्तुगीजांनी शेकडो चर्च उभारली आहेत. त्यातील काही चर्च ऐतिहासिक ठरली आणि त्या चर्चच्या नावावरून त्या गावालादेखील त्यांची नावे प्राप्त झाली. या चर्चची बांधकामे झाली तो काळ युरोपमध्ये ‘रेनेसांज’ म्हणजे परिवर्तनाचा काळ. या काळावर पोर्तुगालमध्ये तिथला प्रसिद्ध राजा मॅन्युअल याचा मोठा प्रभाव होता, म्हणून त्या कालखंडातील स्थापत्यशास्त्राला ‘मॅन्युएलियन स्थापत्य व कलाकुसर’ असे म्हटले जाते. वसई किल्ल्यात जी भली मोठी सात चर्च होती, त्यातील काही चर्च आणि वसई  किल्ल्याबाहेर उभी असलेली काही चर्च याच शैलीत उभी राहिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चर्चमध्ये ‘बारोख’ नावाच्या स्थापत्यशास्त्राच्या अनुषंगाने काही चर्च बांधण्यात आली. वसईतील थोडीच काही चर्च या शैलीत बांधण्यात आली आहेत. आज किल्ल्यामध्ये शिरताच उजव्या हातावर काहीशा तांबूस रंगाच्या दगडात संत अंतोनी याला समर्पित केलेले एक चर्च उभे आहे. त्या चर्चच्या प्रवेशद्वाराजवळ एक सभामंडप आहे. त्या सभामंडपाला अर्धवर्तुळाकार अशा तीन कमानी आहेत, तसेच या चर्चच्या सुरुवातीच्या भिंतीला तीन अर्धवर्तुळाकार प्रवेशद्वारे आहेत. त्या कलाकुसरीला ‘बारोख’ असे म्हटले जाते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Church in vasai built by portuguese
First published on: 04-07-2017 at 00:40 IST