डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील शिव मंदिर रस्त्यावरील पुसाळकर उद्यानाची दुरवस्था झाली आहे. सकाळ, संध्याकाळ उद्यानात फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना कचरा, दुर्गंधी, अस्वच्छतेशी तोंड देत उद्यानात वेळ घालवावा लागतो. पावसाळ्यात उद्यानाच्या चारही बाजुने तीन ते चार फूट रानगवत, जंगली झुडपे उगवली आहेत. उद्यानातील मनोरंजन खेळण्यांची दुर्दशा झाली आहे. तरीही उद्यान विभाग या महत्वपूर्ण विषयाकडे लक्ष देत नसल्याने नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.

डोंबिवली शहराच्या मध्यवर्ती ठिकाणचे उद्यान म्हणून शिवमंदिर रस्त्यावरील पुसाळकर उद्यान ओळखले जाते. रामनगर, टिळकनगर, आयरे, सुनीलनगर भागातील रहिवासी या उद्यानात फिरण्यासाठी येतात. महिलांची संख्या लक्षणीय असते. गेल्या वर्षापासून या उद्यानाची देखभाल केली जात नाही. उद्यानात सकाळीच श्वानांची विष्ठा, उंदीर, खुशी मरुन पडलेल्या असतात. टंडन रस्त्यावरील सार्वजनिक शौचालयाची दुर्गंधी या भागात पसरते. त्यामुळे लाखो रुपये खर्च करुनही या उद्यानाचा नागरिकांना कोणताही उपयोग नाही, अशा तक्रारी या मैदानात फिरण्यासाठी येणाऱ्या महिला, पुरुषांनी केल्या.

E-communication of 4500 prisoners with their families
साडेचार हजार कैद्यांचा कुटुंबीयांशी ‘ई-संवाद’
wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
Versova Koliwada, facilities Versova koliwada,
वर्सोवा कोळीवाड्याला सोयी-सुविधांची प्रतीक्षा

हेही वाचा : कल्याणच्या दुर्गाडीवर शिंदे गटाच्या नवरात्रोत्सवास परवानगी

वेळेचे बंधन

सकाळी उघडण्यात आलेले उद्यान सकाळी ११ वाजेपर्यंत सुरू ठेवावे. रात्रीच्या वेळेत १० वाजेपर्यंत उद्यान उघडे ठेवावे अशी नागरिकांची मागणी आहे. उद्यान सकाळी १० वाजता बंद केले जाते. रात्री नऊ वाजले की नागरिकांना बाहेर काढले जाते. पहाटे पासून नागरिक पुसाळकर उद्यानात फिरण्यासाठी येतात. तेथे अनेक वेळा विजेचे दिवे लावलेले नसतात. त्यामुळे माजलेल्या गवतामधून एखादा साप बाहेर येऊन चावण्याची भिती असते. मनोरंजनाची लोखंडी, लाकडी खेळण्यांची देखभाल केली जात नसल्याने त्यांची मोडतोड झाली आहे. ही खेळणी पावसात कुजत पडली आहेत. परिसरातील लहान मुले या खेळण्यांचा आस्वाद घेण्यासाठी सकाळ, संध्याकाळ येत होती. आजी-आजोबा, नातवंडे यांची या खेळण्या भोवती नियमित गर्दी होती. आता या खेळण्यांभोवती चिखल, चार फूट गवत उगवले आहे. उद्यानातील आसनां भोवती गवत, चिखल असल्याने अनेक नागरिक सिमेंटच्या कट्ट्यावर बसतात. कट्ट्या भोवती घाण, गवत आहे. नाईलाजाने नागरिक ते सहन करतात. उद्यान कोण सुरू करते, कोण बंद करते याची माहिती नागरिकांना दिली जात नाही. तेथे पूर्ण वेळ सुरक्षा रक्षक नाही. उद्यानातील लाद्यांवर पावसामुळे शेवाळ साचले आहे. ते ठेकेदाराने स्वच्छ करुन धुऊन काढणे आवश्यक आहे. या शेवाळावर घसरुन नागरिक पडण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा : पुन्हा तेच…खड्डे-पाऊस यामुळे ठाण्यात सकाळपासून वाहतुक कोंडीचे विघ्न

ठेकेदाराची पाठराखण

या भागाचे स्थानिक माजी नगरसेवक मंदार हळबे यांनी सांगितले, वर्षभर या उद्यानीची देखभाल करावी म्हणून आपण उद्यान विभागाचे अधीक्षक संजय जाधव यांना वेळोवेळी सांगितले आहे. अधीक्षक जाधव यांच्याकडून मे. भागड ठेकेदाराला कोणतीही समज दिली जात नाही. ठेकेदाराची ते पूर्ण पाठराखण करतात. त्यामळे ठेकेदार उद्यानाकडे फिरकत नाही. उद्यानातील कुपनलिकेतून टंडन रस्त्यावरील सार्वजनिक शौचालयाला पाणी पुरवठा केला जात होता. त्यामुळे याभागात स्वच्छता राखली जात होती. दुर्गंधी येत नव्हती. या शौचालयाचा पाणी पुरवठा उद्यान अधीक्षक जाधव यांच्या सूचनेवरुन तोडण्यात आला. लाखो रुपये खर्चून आपल्या नगरसेवक निधीतून मनोरंजन खेळणी बसविण्यात आली. त्यांची दुर्दशा झाली आहे. प्रशासनाचे त्याकडे लक्ष नाही. उद्यानाच्या देखभालीवर किती खर्च झाला. वीज देयक याची इत्यंबूत माहिती आपण उद्यान विभागाकडे मागितली. ती माहिती अपूर्ण देण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासन मे. भागड ठेकेदाराला पाठिशी घालत आहे. ठेकेदाराला संपर्क केला की तो योग्य प्रतिसाद देत नाही, असे माजी नगरसेवक हळबे यांनी सांगितले.

ठेकेदाराला पुसाळकर उद्यानाच्या देखभालीसाठी कळविण्यात आले आहे. उद्यानाची स्वच्छता करणारी महिला आजारी आहे. त्यामुळे स्वच्छतेचा प्रश्न आहे. या उद्यानाच्या दुरवस्थेविषयी तक्रारी आहेत. ठेकेदाराला त्या कळविण्यात आल्या आहेत. आयुक्त पोर्टलवर अनेकांनी तक्रारी केल्या आहेत. -महेश देशपांडे ,उद्यान अधीक्षक, डोंबिवली विभाग