ठाणे :स्वच्छतेला प्राधान्य देत रस्त्यांची नियमित साफसफाई करा ; महापालिका आयुक्तांचे आदेश

महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सोमवारी शहराच्या विविध भागांचा पाहणी दौरा करून विकासकामांचा आढावा घेत अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना केल्या.

ठाणे :स्वच्छतेला प्राधान्य देत रस्त्यांची नियमित साफसफाई करा ; महापालिका आयुक्तांचे आदेश
ठाणे महापालिका ( संग्रहित छायाचित्र )

महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सोमवारी शहराच्या विविध भागांचा पाहणी दौरा करून विकासकामांचा आढावा घेत अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना केल्या. स्वच्छतेला प्राधान्य देत रस्त्यांची नियमित साफसफाई, रस्ते दुरुस्ती, रंगरंगोटी तसेच पदपथ साफ ठेवणे अशी कामे प्राधान्याने करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

ठाणे शहरातील विविध परिसरांना आयुक्त डॉ. शर्मा यांनी सोमवारी भेटी देऊन तेथील सुशोभिकरण, रस्ते दुरुस्ती, गटर आणि साफसफाई कामाची पाहणी केली. आनंदनगर परिसरात घनकचरा संकलनाचे वेळापत्रक स्थानिक परिस्थितीनुसार निश्चित करणे, दत्ताजी साळवी उद्यानासमोरील पदपथावर असलेली माती उचलणे, उद्यानासमोरील रस्ता तसेच पदपथाची साफसफाई करणे, आनंदनगर येथील महापालिका प्रवेशद्वारावर पालिकेचा लोगो ठळकपणे प्रदर्शित करणे, ज्ञानसाधना महाविद्यालयसमोरील नाल्यातील कचरा काढून घेणे, ज्ञानसाधना कॉलेज ते तीन हात नाका सेवा रस्त्याची नियमितपणे साफसफाई करुन घेणे, बाळासाहेब ठाकरे स्मारक समोरील पार्किंग त्वरीत सुरु करणे आणि बाळासाहेब ठाकरे मुख्य प्रवेशद्वार वॉटर प्रुफींग करणे असे निर्देश आयुक्त डॉ. शर्मा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिले.

तीन हात नाका तसेच नितिन नाका येथे मे.रौनक या संस्थेमार्फत दिलेल्या सुचनेनुसार सौंदर्यीकरण करुन घेणे, एलबीएस रस्त्यावरील एमएमआरडीएमार्फत करावयाच्या कामा व्यतिरिक्त इतर सर्व कामे ठरलेल्या कालावधीत पूर्ण करुन घेणे, सुपरमॅक्स कंपनीसमोरील रस्त्याची दुरुस्ती करुन घेणे, तीन हात नाका ते चारी रुग्णालयपर्यंतच्या सेवा रस्त्या लगत भिंतीवर रंगरंगोटी करणे, ग्रीनरोड गृहसंकुल परिसरातील भिंतीवर रंगरंगोटी करणे, आरटीओ तसेच एलआयसी पदपथावरील अतिक्रमणे आणि अनधिकृत पार्किंगवर कारवाई करणे तसेच महावीर जैन हॉस्पिटल समोरील दुभाजकामध्ये वृक्षारोपण करणे असे निर्देशही आयुक्त डॉ. शर्मा यांनी संबधित अधिकाऱ्यांना यावेळी दिले. या पाहणी दौऱ्यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, संजय हेरवाडे, नगर अभियंता प्रशांत सोनग्रा यांच्यासह इतर महापालिका अधिकारी उपस्थित होते.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Clean roads regularly giving priority cleanliness order thane municipal commissioner amy

Next Story
बांधकाम विभागाचे खड्डे भरणीच्या कामाकडे दुर्लक्ष ; डोंबिवलीत रिक्षा चालकांकडून श्रमदानातून रस्त्यावरील खड्डे भरणी
फोटो गॅलरी