climate change in maharashtra winter experience in badlapur city zws 70 | Loksatta

बदलापूर शहरात हिवसाळय़ाचा अनुभव ; पुणे, नाशिकपेक्षा तापमानात घट; एकाच वेळी पाऊस आणि धुके

गुरुवारी सकाळपासूनच मुंबई महानगर प्रदेशातील सर्व शहरांमध्ये गारवा जाणवत होता.

बदलापूर शहरात हिवसाळय़ाचा अनुभव ; पुणे, नाशिकपेक्षा तापमानात घट; एकाच वेळी पाऊस आणि धुके
(संग्रहित छायाचित्र)

लोकसत्ता प्रतिनिधी

बदलापूर : सप्टेंबर महिन्यात अवघ्या १५ दिवसात पावसाने सरासरी ओलांडल्यानंतर या आठवडय़ात तापमानात नीचांकी नोंद झाली. गुरुवारी सकाळपासूनच मुंबई महानगर प्रदेशातील सर्व शहरांमध्ये गारवा जाणवत होता. तर मुंबई महानगर प्रदेशातील सर्वात कमी तापमानाची नोंद बदलापुरात झाली.

त्यामुळे पावसाळय़ात हिवाळय़ाचा अनुभव येत होता. गुरूवारी मध्यरात्री आणि शुक्रवारी सकाळीही गारवा जाणवत होता.

वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे गेल्या काही दिवसात काही ठिकाणी संततधार तर काही भागात ढगफुटीसदृश पाऊस पडल्याचे दिसून आले.  हा पाऊस नवरात्रोत्सवातही पडण्याची शक्यता असताना  गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात कमालीचा गारवा जाणवत आहे. गुरूवारी दिवसभर आणि शुक्रवारी पहाटे हा गारवा अनुभवास आला. मुंबई महानगर क्षेत्रातील जवळपास सर्वच शहरांमध्ये सरासरी २५ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. यात सर्वात कमी नोंद बदलापुरात झाली. 

कारण काय?

आकाशात ढगांची गर्दी होते. त्याचवेळी वाऱ्याला गती नसल्याने काळे ढग जमिनीपासून अवघ्या ३०० ते ४०० फुटांवर तरंगतात. त्यात आद्र्रता असल्यामुळे स्थानिक पातळीवर शहरांचे तापमान कमी होते. पाऊस पडेल असे वाटते, पण त्याऐवजी थंडी जाणवते, अशी माहिती हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली.

वेगळे काय? गुरुवारी बदलापुरात वर्षांतील सर्वात कमी म्हणजे २३.७ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले. ते थंडीतल्यासारखेच होते.  पुणे आणि नाशिकच्या तापमानापेक्षाही कमी तापमान गुरुवारी मुंबईत आणि इतर शहरात नोंदवले गेले.

अचानक गारवा..

गुरूवारी नाशिकचे तापमान २४.७ तर पुण्याचे तापमान २८.७ अंश सेल्सियस इतके नोंदवले गेले. त्याचवेळी मुंबईचे तापमान अवघे २५.१ अंश सेल्सियस इतके नोंदवले गेले. त्यामुळे पुणे, नाशिकपेक्षा मुंबईत अधिक गारवा होता.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
ठाणे : शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातून ३० हजारांचे लक्ष्य

संबंधित बातम्या

डोंबिवलीचा पाणी पुरवठा मंगळवारी बंद
कल्याण रेल्वे स्थानकात प्रवाशांना लुटणारे तीन जण अटक
ठाणे रेल्वे स्थानकात महिलेचा विनयभंग
‘छत्रपती शिवाजी महाराजां’ची गद्दारांशी तुलना करणाऱ्या लोढांवर आनंद परांजपे यांची टिका, म्हणाले “खंजीर खुपसून मुख्यमंत्री झालेल्यांची…”
डोंबिवली: मोकाट बैलाने मारलेल्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा बस खाली चिरडून मृत्यू

व्हिडिओ

ताज्या बातम्या
‘काश्मीर फाइल्स’ अप्रतिम सिनेमा, पण प्रोपगंडाच! राजकीय दबावामुळे इफ्फीत समावेश – नदाव लॅपिड
Petrol-Diesel Price on 1 December 2022: डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमतीमध्ये मोठी उलाढाल; पाहा नवे दर
Gujarat Election: २९० कोटी कॅश, ५०० कोटींहून अधिकचे अंमली पदार्थ जप्त; दारुबंदी असलेल्या राज्यात १५ कोटींची दारु ताब्यात
केजरीवाल यांच्या रॅलीत आपच्या आमदारांचेच मोबाईल लंपास, नेतेमंडळींनी घेतला चोरट्यांचा धसका!
आरपीआयचे माजी जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड यांना अटक