Premium

ठाण्यात समूह विकास मार्गी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्या प्रकल्पास प्रारंभ

शहरातील बहुचर्चित समूह विकास योजनेचा (क्लस्टर) शुभारंभ येत्या सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

thane slum
शहरातील बहुचर्चित समूह विकास योजनेचा (क्लस्टर) शुभारंभ येत्या सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार

ठाणे : शहरातील बहुचर्चित समूह विकास योजनेचा (क्लस्टर) शुभारंभ येत्या सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून कागदावर असलेल्या या योजनेच्या अंमलबजावणीला अखेर सुरुवात होणार असून अधिकृत आणि मालकी हक्काच्या घरात राहण्याचे नागरिकांचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे शहरात मोडकळीस आलेल्या धोकादायक अनधिकृत व अधिकृत इमारतींचा सुनियोजित तसेच संपूर्ण नागरी पायाभूत सुविधांसह पुनर्विकास करण्यासाठी क्लस्टर योजना राबविण्यात येणार आहे. एकूण ४५ नागरी पुनरुत्थान आराखडे तयार करण्यात आले असून त्याचे एकूण क्षेत्रफळ १५०० हेक्टर इतके आहे. अनधिकृत व अधिकृत धोकादायक इमारतीचा सामूहिक पुनर्विकास करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या संकल्पनेतून नियमावली तयार करण्यात आली. या ४५ आराखडय़ांपैकी अत्यंत दाटीवाटीचे क्षेत्र असलेल्या किसननगर नागरी पुनरुत्थान आराखडा क्रमांक १२ मधील नागरी पुनरुत्थान योजना क्रमांक १ आणि २ ची अंमलबजावणी सिडको या शासनाच्या कंपनीमार्फत होणार आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-06-2023 at 04:17 IST
Next Story
मुख्यमंत्र्यांच्या दिवा दौऱ्यावेळी भाजपचे बेकायदा बांधकाम प्रदर्शन; दोन्ही पक्षांतील वाद पुन्हा चव्हाटय़ावर