ठाणे : गेल्या तीन ते चार दिवसांपासून प्रकृती ठिक नसल्यामुळे ठाण्यातील शुभदीप निवासस्थानी विश्रांती घेत असलेले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी दुपारी ज्युपीटर रुग्णालयात जाऊन वैद्यकीय तपासणी केली. या अहवालात कोणतीही चिंताजनक बाब नसल्याचे समोर आले असून यानंतर मुख्यमंत्री शिंदे हे आपला ताफा घेऊन मुंबईतील वर्षा निवासस्थानी रवाना झाले. याठिकाणी ते बैठका घेणार की नाही, याबाबत मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

एकीकडे राज्यातील सरकार स्थापन आणि खातेवाटपावरून महायुतीच्या नेत्यांमधून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असतानाच, दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती शनिवारी बिघडली. विधानसभा निवडणुकीत झालेल्या धावपळीमुळे आराम करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे हे साताऱ्यातील दरे गावी गेले होते. तिथे त्यांची प्रकृती बिघडली होती. तिथे त्यांनी शनिवारी दिवसभर विश्रांती घेतली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी ते ठाण्यातील शुभदीप निवासस्थानी परतले. सोमवारी ते पुन्हा पक्ष आणि महायुतीच्या बैठकांमध्ये सक्रिय होतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु सोमवारीही त्यांची प्रकृती ठीक नव्हती. यामुळे त्यांनी दिवसभरातील बैठका रद्द करून घरीच विश्रांती घेतली.

Vishnu Bhangale suspended from the Thackeray group, is now Jalgaon district head of Shinde group
जळगावमध्ये ठाकरे गटातून निलंबित, विष्णू भंगाळे आता शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
News About Eknath Shinde
Eknath Shinde : ठाकरे-फडणवीसांची भेट, महायुतीत एकनाथ शिंदेंच्या नाराजीचा दुसरा अंक?
Eknath Shinde Shivsena Demand
Shivsena : “बाळासाहेबांच्या स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटवा”, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी
Eknath Shinde on Santosh Deshmukh Murder Case
Eknath Shinde: “कुणाचेही लागेबंधे असले तरी…”, संतोष देशमुख प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा
Eknath Shinde , Rickshaw ,
VIDEO : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हाती पुन्हा रिक्षाचे स्टेरिंग, शिंदे यांनी दिला जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा
What Eknath Shinde Said?
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला, “सरडाही रंग बदलतो, पण अशी नवी जात…”
eknath shinde shivsena
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात, “सर्व पक्षांनी एकच रस्ता धरलाय, तो म्हणजे धनुष्यबाणाची शिवसेना”

हेही वाचा – क्रिप्टो चलनाच्या नावाने २६ लाख रुपयांची फसवणूक

हेही वाचा – ठाणे : टेस्ट ड्राईव्ह घेण्याच्या बहाण्याने दुचाकी चोरी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ताप होता. घशाला संसर्ग होण्याबरोबरच पांढऱ्या पेशी कमी झाल्या होत्या. यामुळे त्यांना सोमवारी घरीच सलाईन लावण्यात आली होती. भाजप नेते गिरीश महाजन यांनी शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांची प्रकृती पूर्णपणे बरी झालेली नाही. मंगळवार दुपारपर्यंत त्यांनी ठाण्यातील निवासस्थानीच विश्रांती घेतली. यानंतर दुपारी ते ज्युपीटर रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी गेले होते. तिथे त्यांच्या काही वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. यामध्ये या वैद्यकीय अहवालात कोणतीही चिंताजनक बाब नसल्याचे समोर आले. तपासणीनंतर रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वत: प्रकृती ठीक असल्याचे सांगितले. यानंतर मुख्यमंत्री शिंदे हे आपला ताफा घेऊन मुंबईतील वर्षा निवासस्थानी रवाना झाले. याठिकाणी ते बैठका घेणार की नाही, याबाबत मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

Story img Loader