उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची महायुतीच्या मिरवणुकांना हजेरी   

ठाणे : वसुबारसच्या दिवसाचा मुहूर्त साधत शिवसेनेचे कोपरी पाचपखाडीतील उमेदवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ठाणे शहरातील भाजपचे उमेदवार संजय केळकर आणि कळवा-मुंब्य्रातील राष्ट्रवादी (अजित पवार गट) चे उमेदवार नजीब मुल्ला या महायुतीच्या नेत्यांनी मिरवणुकांद्वारे शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. त्याचबरोबर शिवसेनेचे (ठाकरे गट) कोपरी पाचपखाडीतील उमेदवार केदार दिघे आणि ओवळा-माजिवडा मतदार संघातील मनसेचे उमेदवार संदीप पाचंगे यांनीही मिरवणुकद्वारे शक्तीप्रदर्शन काढत उमेदवारी अर्ज दाखल केले. यामुळे सोमवारी शहरातील विविध मार्गांवर राजकीय पक्षांच्या शक्तीप्रदर्शनामुळे काहीकाळ वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र दिसून आले.

मुख्यमंत्र्याचे बालेकिल्ल्यात शक्तीप्रदर्शन

कोपरी-पाचपखाडी हा मतदार संघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या मतदार संघातून एकनाथ शिंदे हे चौैथ्यांदा निवडणुक लढवित आहेत. शिवसेनेतील बंडानंतर विधानसभेची ही पहिलीच निवडणुक होत आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्याविरोधात शिवसेना (ठाकरे गट) ने केदार दिघे यांना उमेदवारी देऊ केली आहे. या मतदार संघात शिंदे विरुद्ध ठाकरे असा सामना होणार आहे. या निवडणुकीकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. वागळे इस्टेट येथील माॅडेला चेक नाका येथे सकाळी १० वाजल्यापासूनच शिंदेच्या शिवसेनेचे कार्यकर्ते जमण्यास सुरूवात झाली होती. त्यांच्या हातात भगवे झेंडे, शिंदेचे पोस्टर असलेले फलक, डोक्यावर भगव्या टोप्या होत्या. महिलाही मोठ्या संख्येने जमल्या होत्या. त्याचबरोबर भाजप आणि आरपीआयचे कार्यकर्तेही पक्षाचे झेंडे घेऊन मिरवणुकीत सामील झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी संत एकनाथ महाराजांचे वंशज योगीराज महाराज गोसावी यांनी येऊन शुभआशीर्वाद दिले. दत्तमंदिर येथून मिरवणुकीला सुरूवात झाली. ढोल-ताशांच्या गजरात ही मिरवणुक निघाली होती. किसननगर येथील सर्कलपर्यंत ही मिरवणुक काढण्यात आली. उन्हाचा पारा वाढल्यामुळे मिरवणुकीत सामील झालेल्या कार्यकर्त्यांना पिण्याच्या पाण्याबरोबर फुड पॅकेटचे वाटप करण्यात आले. या मिरवणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे सामील झाले होते. वागळे इस्टेट भागातील इमारतींवरून नागरिकांनी शिंदे यांच्यावर पुष्पवृष्टी केली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक यांच्यासह शिंदे यांचे कुटूंबिय उपस्थित होते.

Jitendra Awhad fights with NCP-SCP Leader Yunus Shaikh ani
Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड शरद पवार गटातील नेत्याशी भिडले, माध्यमांसमोर हमरीतुमरी; अंतर्गत वाद चव्हाट्यावर, VIDEO व्हायरल
9th december 2024 Marathi Daily Horoscope in marathi
९ डिसेंबर पंचांग; दुर्गाष्टमीला सिद्धी योगामुळे १२ राशींचा…
Sada Sarvankar
Sada Sarvankar : “मला निवडणूक लढवावीच लागेल”, सदा सरवणकर हतबल; म्हणाले, “राज ठाकरेंनी माझी…”
thane assembly constituency sanjay kelkars strength with candidature of ubt rajan vichare for maharashtra vidhan sabha election 2024
Thane Vidhan Sabha Constituency : राजन विचारेंच्या उमेदवारीने ठाण्यात संजय केळकर यांना बळ
Maharashtra assembly election 2024 Sharad Pawar NCP releases fourth list of 7 candidates
Sharad Pawar NCP 4th Candidate List : मोठी बातमी! शरद पवारांच्या राष्ट्रवादीची चौथी यादी जाहीर; सात उमेदवारांची घोषणा, कोणाला कुठून मिळाली संधी?
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
puja khedkar father dilip khedkar affidevit
पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात, पण प्रतिज्ञापत्रातील ‘या’ नोंदीमुळे अडचणीत येण्याची शक्यता!
Sharad Pawar NCP gives Tickets to Rohit Patil and Siddhi Kadam
Sharad Pawar NCP Young Candidate : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणुकीतल्या रिंगणात उतरलेले सर्वात तरुण उमेदवार कोण?

हेही वाचा >>> भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते कल्याणमधील नाराजांची समजूत काढण्यास अपयशी; नरेंद्र पवार, महेश गायकवाड यांचे उमेदवारी अर्ज दाखल

केदार दिघेंनी काढली मिरवणुक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात शिवसेना (ठाकरे) गटाने आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना उमेदवारी देऊ केली असून त्यांनी सोमवारी मिरवणुक काढत उमेदवारी अर्ज दाखल केला. रघुनाथ नगर येथील शाखेजवळून केदार यांची मिरवणुक निघाली होती. या मिरवणुकीत कार्यकर्त्यांच्या हातात भगवे झेंडे, मफलर आणि टोप्या होत्या. शिवसेनेचे दिवंगत जिल्हा प्रमुख आनंद दिघे आणि शिवसेना (ठाकरे ) गटाचे नेते अदित्य ठाकरे यांचे पोस्टर कार्यकर्त्यांच्या हातात होते. फटक्यांची आतषबाजी कार्यकर्त्यांकडून करण्यात येत होती. या मिरवणुकीत राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे कार्यकर्तेही सामील झाले होते. केदार दिघे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

ठाणे शहरात भाजपचे शक्तीप्रदर्शन

ठाणे शहरातील भाजपचे उमेदवार संजय केळकर यांनी सोमवारी सकाळी उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यापुर्वी त्यांनी घंटाळी देवीचे दर्शन घेऊन मिरवणूक काढली. या मिरवणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते. या मिरवणूकीत कमळाचे चिन्ह, संजय केळकर आणि देवेंद्र फडणवीस यांच्या छायाचित्र असलेले पोस्टर आणि पक्षाचे झेंडे घेऊन कार्यकर्ते सहभागी झाले होते. शिंदेच्या शिवसेना, राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि रिपाइ चे कार्यकर्ते पक्षाचे झेंडे घेऊन मिरवणुकीत सामील झाले होते. ध्वनी क्षेपकावर प्रभु श्रीरामांची गीते सुरू होती. घंटाळी रोड,  राम मारुती रोड, मासुंदा तलाव, जांभळीनाका, टेंभीनाका मार्गे मिरवणुक आनंद आश्रमात आली. आनंद आश्रमात संजय केळकर यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले आणि त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल करण्यासाठी गेले. या मिरवणुकीच्या मार्गांवर काहीकाळ वाहतुक कोंडी झाल्याचे चित्र दिसून आले. राम गणेश गडकरी रंगायतन परिसरातही काही प्रमाणात कोंडी झाली होती.

हेही वाचा >>> भाजपचे नेते उमेदवारीसाठी शिंदे सेनेत

नजीब मुल्ला यांचेही शक्तीप्रदर्शन

कळवा मुंब्रा मतदार संघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला ओळखला जातो. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड हे या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर एक मोठा गट अजित पवार यांच्या सोबत गेला. त्यामध्ये एकेकाळी आव्हाड यांचे समर्थक असलेले नजीब मुल्ला यांचाही समावेश होता. यंदाच्या निवडणुकीत आव्हाड यांच्याविरोधात अजित पवार गटाने नजीब मुल्ला यांना उमेदवारी देऊ केली आहे. सोमवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास नजीब यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक, भाजपाचे आमदार निरंजन डावखरे उपस्थित होते. अर्ज दाखल करण्यापूर्वी नजीब यांनी मुंब्रा रेल्वे स्थानक ते कौसा येथील स्टेडियम पर्यंत मिरवणूक काढली. या मिरवणुकीमध्ये कळवा पूर्व येथील भास्कर नगर, महात्मा फुले नगर, वाघोबा नगर या भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. सुमारे १५ ते २० बसगाड्या भरून महिला या भागातून आल्या होत्या. नजीब यांच्यासोबत माजी नगरसेवक राजन किणे हे देखील उपस्थित होते. मुंब्रा शहरातील प्रत्येक चौकामध्ये मुल्ला यांच्या स्वागतासाठी मंडप उभारण्यात आला होता. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी ढोल ताशांच्या गजरामध्ये नजीब यांचे स्वागत केले. या मिरवणुकीदरम्यान मुल्ला यांनी मुंब्य्रातील वादग्रस्त शिवसेना शाखेलाही भेट दिली.

मनसेचीही मिरवणुक मनसेचे संदीप पाचंगे यांनी ओवळा- माजिवडा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यापुर्वी त्यांनी वर्तकनगर येथील साईबाबा मंदीरात आणि जानका देवी मंदीरात जाऊन दर्शन घेतले. वर्तकनगर नाका ते पोखरण रस्ता अशी ही मिरवणुक काढण्यात आली. या मिरवणुकीत मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सामील झाले होते. हातात पक्षाचे झेंडे आणि गळ्यात मफलर घातले होते. या मिरवणुकीच्या माध्यमातून मनसेने शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. पांचगे यांनी अर्ज दाखल केला. त्यावेळी मनसेचे नेते अभिजीत पानसे तसेच मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Story img Loader