scorecardresearch

ठाण्याच्या तुलनेत रायगड आणि पालघरमधील महिलांचे आरोग्य चिंताजनक

माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ या योजने अंतर्गत कोकण विभागातील ठाणे, पालघर आणि रायगडमधील १८ वर्षावरील मुली व महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली होती.

Healthy
(संग्रहित छायाचित्र)

महिलांमध्ये हायपर टेंशनचे प्रमाण वाढतेय; माता सुरक्षित तर घर सुरक्षित योजनेंत अंतर्गत माहिती समोर

माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ या योजने अंतर्गत कोकण विभागातील ठाणे, पालघर आणि रायगडमधील १८ वर्षावरील मुली व महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली होती. या तपासणीत महिलांमध्ये सर्वाधिक उच्चरक्तदाब अर्थात हायपर टेन्शनचा त्रास अधिक असून त्याखालोखाल मधुमेह, स्तनांचा कर्करोग सारख्या आजाराने त्रस्त असल्याची माहिती समोर आली आहे. त्यात ठाणे जिल्ह्याच्या तुलनेत पालघर आणि रायगड जिल्ह्यातील महिलांमध्ये उच्चरक्तदाब प्रमाण अधिक असल्याची बाब आकडेवारीवरून समोर आली आहे.

हेही वाचा >>>मातोश्री आणि खोके हे वेगळे आहे का? शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांचा आदित्य ठाकरेंना सवाल

घरातील स्त्री ही त्या कुटुंबाचा कणा असते. आज सर्वच क्षेत्रात यश मिळविणारी महिला घर, नोकरी अथवा शेतमजूरी, संसार या तीन ही पातळ्यांवर जबाबदारी पेलत आहे. ही जबाबदाऱ्या पेलताना त्यांची कसरत होत आहे. माता व बाल मृत्यूचे प्रमाण फारसे कमी होताना दिसत नाही. गरोदरपणात महिलांमध्ये रक्ताचे प्रमाण अत्यल्प आढळत असते. ग्रामीण आणि अतिदुर्गम भागातील महिलांच्या आरोग्य तपासणीकडे कुटुंबाकडून अनेकदा दुय्यम स्थान देण्यात येत असते. प्रामुख्याने घरातील स्त्री आरोग्यदृष्टीने सशक्त असेल तर घर सुरक्षित ही संकल्पना घेऊन नवरात्रोत्सवाच्या काळात शासनाच्या वतीने ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ ही योजना राबविण्यात आली. ती योजना तीन महिन्यांसाठी राबविण्यात आली होती. यामध्ये महिलांची रक्तदाब, मधुमेह, ह्दयविकार, स्तनांसह गर्भाशयांच्या मुखाचा कर्करोग ची तपासणी करण्यात आली होती. यामध्ये ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात सर्वाधिक महिलांना उच्च रक्तदाब आणि मधुमेहासह स्तनांचा कर्करोग असल्याचे अहवालातून समोर आले आहे.

हेही वाचा >>>मातोश्री आणि खोके हे वेगळे आहे का? शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांचा आदित्य ठाकरेंना सवाल

ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या १ कोटीच्या आसपास आहे. तर पालघरची ३५ लाख ३६ हजार ४७५ आणि रायगडची ३० लाख ८७ हजासर ६५१ इतकी आहे. या लोकसंख्येच्या तुलनेत तपासणी केली गेलेल्या महिलांमध्ये विविध आजारांच्या महिलांची संख्य लक्षणीय असल्याचे समोर आले आहे. तपासणी करण्यात आलेले महिलांमध्ये सर्वाधिक हायपर टेन्शनचा (उच्चरक्तदाब) त्रास अधिक असल्याचे समोर आले असून त्याखालोखाल मधुमेह, स्तनांचा कर्करोग सारख्या आजाराने त्रस्त असल्याची माहिती समोर आली आहे. ठाणे जिल्ह्याच्या तुलनेत सर्वाधिक हा आजार पालघर आणि रायगडमधील महिलांना असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. ठाणे जिल्ह्यातील ४३ हजार महिलांची उच्च रक्तदाबाची तपासणी करण्यात आली होती. यामध्ये १ हजार ७०५ महिलांना उच्च रक्तदाबाचा आजार असल्याचे निष्पन्न झाले आहे. तर सर्वाधिक पालघर आणि रायगड मधील महिलांना हा त्रास अधिक असून सुमारे ११ हजार हून अधिक महिला या आजारातून जात असल्याचे आकडेवारी वरून समोर आले आहे.

आजाराचे निदान झालेल्या महिलांची संख्या

जिल्हा उच्च रक्तदाब मधुमेह स्तनांचा कर्करोग

ठाणे १ हजार ७०५ १ हजार ९ १८
पालघर ११ हजार ८९६ ५ हजार ९६७ ५१७

रायगड ११ हजार १६२ ५ हजार ९६३०

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-02-2023 at 19:12 IST
ताज्या बातम्या