ठाणे : टेंभीनाका वाहतूक बदलामुळे शहरात कोंडी | Congestion in the city due to Tembhinaka traffic change amy 95 | Loksatta

ठाणे : टेंभीनाका वाहतूक बदलामुळे शहरात कोंडी

टेंभीनाका येथील नवरात्रौत्सवामुळे लागू करण्यात आलेल्या वाहतूक बदलांचा परिणाम मंगळवारी ठाण्यात दिसून आला.

ठाणे : टेंभीनाका वाहतूक बदलामुळे शहरात कोंडी
( संग्रहित छायचित्र )

टेंभीनाका येथील नवरात्रौत्सवामुळे लागू करण्यात आलेल्या वाहतूक बदलांचा परिणाम मंगळवारी ठाण्यात दिसून आला. शहरातील खोपट, जांभळीनाका, तलावपाली, गडकरी रंगायतन चौक, बाजारपेठ या भागात पर्यायी मार्गांवर वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे ठाणे रेल्वे स्थानक, नौपाडा येथे जाणाऱ्या वाहन चालकांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहचता आले नाही. वेळेत रिक्षा उपलब्ध होत नसल्याने रेल्वे स्थानकाखालील रिक्षा थांब्यावरही प्रवाशांची गर्दी झाली होती. ५ ऑक्टोबरपर्यंत हे वाहतूक बदल लागू असल्याने पुढील आठवडाभर सकाळी आणि रात्रीच्या वेळेत वाहन चालकांना आणि प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>> मुंबईतील डाॅक्टरची डोंबिवलीतील स्वस्थम आयुर्वेदच्या संचालकांकडून ८५ लाखाची फसवणूक

टेंभीनाका येथील चौकामध्ये नवरात्रौत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी या मार्गावरील वाहतूकीमध्ये बदल करून येथील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे रेल्वे स्थानक परिसरातून टेंभीनाक्याच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना जांभळीनाका मार्गे तसेच ठाणे रेल्वे स्थानकाच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मार्गे जांभळीनाका बाजारपेठ किंवा खोपट मार्गे वाहतूक करावी लागत आहे. मंगळवारी सकाळपासून या वाहतूक बदलाचा परिणाम ठाणेकरांना सहन करावा लागला. खोपट मार्गावर वाहनांचा भार वाढला होता. त्यामुळे वंदना सिनेमागृह ते खोपट येथील मनोरपाड्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तसेच चरई भागातही वाहतूक कोंडी झाली होती. तर ठाण्याहून तलावपालीच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या मार्गावर चिंतामणी चौक ते रेल्वे स्थानक परिसर आणि जांभळीनाका बाजारपेठेपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. दुपारी २ नंतरही वाहतूक कोंडी कायम होती. त्यामुळे सॅटीस पूलाखाली पुरेशा रिक्षा प्रवासांना उपलब्ध होऊ शकल्या नाही. त्याचा परिणाम रिक्षा थांब्यांवर होऊन प्रवाशांची थांब्यावर लांब रांग दिसून आली. बस थांब्यांवरही प्रवाशांच्या रांगा होत्या. कोर्टनाका भागात जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे न्यायालय, जिल्हा शासकीय रुग्णालय आहे. परंतु वाहतूक बदलामुळे आणि कोंडीमुळे अनेकांना स्थानक परिसर ते कोर्टनाका पर्यंत पायी जाण्याची वेळ आली.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
डोंबिवलीत रखवालदाराने मोबाईल चोराला पकडले

संबंधित बातम्या

डोंबिवलीत डॉक्टरची वैद्यकीय व्यावसायिकाला मारहाण
डोंबिवली, कल्याण मधून फेरीवाले गायब; रस्ते, पदपथ मोकळे झाल्याने नागरिकांमध्ये समाधान
पाच हजार कातकऱ्यांची नोंद
दोन वर्षांनंतर होळीच्या बाजाराला रंग ; आकर्षक पिचकाऱ्या, रंग, कपडय़ांची रेलचेल, खरेदीसाठी गर्दी
डोंबिवलीतील विकासकाकडून खंडणी मागणारे अटकेत; आरोपींचे भाजपा नेते प्रकाश मेहता, सोमय्यांसोबत फोटो

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“असाच एकमेकात जीव….” राणादा-पाठकबाईंना शुभेच्छा देणाऱ्या मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
फ्रिजमध्ये खाद्यपदार्थ ठेवताना कोणती काळजी घ्यावी? ‘या’ उपयुक्त टिप्स नेहमी लक्षात ठेवा
पत्नी जेवणात रोज टाकायची थोडं-थोडं विष; संपत्ती हडपण्यासाठी प्रियकराच्या मदतीने काढला पतीचा काटा, आरोपींना अटक
करण जोहरचा बायोपिक येणार? ‘या’ अभिनेत्याने भूमिका साकारण्याची व्यक्त केली इच्छा
मधुमेह होण्याची सतत भीती सतावतेय ? तर आजपासूनच ‘हे’ ५ बदल करा