वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यावरून राज्य सरकारच्या विरूद्ध शुक्रवारी बदलापुरात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आली. ‘ईडी सरकार हायहाय, गुजरात तुपाशी महाराष्ट्र उपाशी, अशी जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली.बदलापूर पूर्वेकडील घोरपडे चौकात शुक्रवारी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रियांका दामले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> उद्धव ठाकरेंकडून नव्या नेमणुका ; किशोर पाटील यांची बदलापूर शहरप्रमुखपदी निवड

यावेळी महिला शहराध्यक्ष अनिता पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश देशमुख, यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. वेदांत प्रकल्पामुळे महाराष्टातील दीड ते दोन लाख बेरोजगारांना नोकरीची संधी मिळणार होती. मात्र राज्य सरकारच्या निष्क्रियतेमुळे हा प्रकल्प गुजारातमध्ये गेला. त्यामुळे राज्यातील युवकांना रोजगाराच्या संधीसाठी मुकावे लागणार आहे. त्याविरूद्ध हे आंदोलन करत असल्याचे यावेळी दामले यांनी सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress agitation against state government over shifting of vedanta foxconn project from maharashtra to gujarat amy
First published on: 23-09-2022 at 17:47 IST