लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : शहरातील काँग्रेसचे मनोज शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना (शिंदे गट) पक्षात प्रवेश केला असतानाच, त्यापाठोपाठ आता, कळव्यातील काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजप पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाणे शहरात काँग्रेस पक्षाला खिंडार पडल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे.

Deputy Chief Minister Eknath Shinde orders to open MSRDC office for new Mahabaleshwar project satara news
नवीन महाबळेश्वर प्रकल्पासाठी महाबळेश्वरमध्ये कार्यालय सुरू करा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Vishnu Bhangale suspended from the Thackeray group, is now Jalgaon district head of Shinde group
जळगावमध्ये ठाकरे गटातून निलंबित, विष्णू भंगाळे आता शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख
possibility of Eknath Shinde and Ganesh Naik coming together in municipal elections is less
महायुतीच्या संकेतांना नवी मुंबईत खोडा? महापालिका निवडणुकीत शिंदे- नाईक मनोमिलनाची शक्यता धुसरच
Eknath Shinde Shivsena Welcomes NCP Congress Leaders in Party
एकनाथ शिंदेंचा शरद पवार व काँग्रेसला दणका, नाशिकमधील मोठ्या नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश
Eknath shinde
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महायुतीचे संकेत, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीत लढल्या जाणार
What Eknath Shinde Said?
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला, “सरडाही रंग बदलतो, पण अशी नवी जात…”
eknath shinde shivsena
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात, “सर्व पक्षांनी एकच रस्ता धरलाय, तो म्हणजे धनुष्यबाणाची शिवसेना”

कळवा पूर्व घोलई नगर येथील काँग्रेसचे सामाजिक न्याय ठाणे शहर अध्यक्ष जगदीश गौरी हे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह रविवारी वर्तक नगर येथील भाजप कार्यालयात दाखल झाले. भाजपचे कामगार मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव प्रशांत तळवडेकर यांच्या पुढाकाराने आणि भाजप ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले यांच्या उपस्थितीत जगदीश गौरी यांचा आणि काँग्रेसचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा भाजप पक्षात प्रवेश झाला.

आणखी वाचा-“मी डोंबिवलीतच, दिल्लीला गेलेलो नाही”, मंत्री रवींद्र चव्हाण यांचे दिल्लीवारीवरच्या अफवांवर स्पष्टीकरण

काँग्रेस मध्ये असताना आमची कुठलीही कामे होत नव्हती, काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणाचा आम्हाला कंटाळा आला होता, त्यामुळे आम्ही सगळ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे जगदीश गौरी यांनी यावेळी सांगितले. त्यांच्यासोबत काँग्रेसचे असंघटित कामगार ठाणे शहर सचिव दिनेश शिळकर, सामाजिक न्याय विभाग ठाणे शहर सचिव संदीप सूर्यवंशी, सुशांत धुळप, वार्ड अध्यक्ष संतोष झिमल तसेच काँग्रेसच्या इतर काही कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

आणखी वाचा-डोंबिवलीतील रिअल इस्टेट कंपनीच्या सदस्यांकडून मुंबईतील व्यावसायिकाची १० कोटीची फसवणूक

यावेळी भाजप ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघुले, ठाणे सरचिटणीस मनोहर सुगदरे, मंडळ अध्यक्ष सुदर्शन साळवी, कार्यकारणी सदस्य अरविंद कलवार, प्रभाग सदस्य गजानन परब, भाजप कामगार मोर्चा सचिव प्रशांत तळवडेकर, उत्तर भारती मोर्चा ठाणे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मीकांत यादव, दिव्यांग सेल सचिव आमिन मिश्रा, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य हर्षला बुबेरा, कळवा मंडळ अध्यक्ष भूषण म्हात्रे, कळवा मंडळ अध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा नरेश गायकवाड उपस्थित होते.

Story img Loader