मध्य रेल्वेच्या कल्याण जवळील विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात एका तरुणाने बुधवारी दुपारी मदुराई एक्सप्रेसखाली आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळी फलाटावर तैनात असलेल्या एका हवालदाराने चपळाई करून रेल्वे मार्गातून त्याला बाजूला ढकलले. त्यामुळे या तरुणाचा जीव वाचला.

कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाल्मीक शार्दुल यांनी सांगितले, विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात दुपारी दोन वाजता कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यातील हवालदार ऋषिकेश माने बंदोबस्तावर होते. एक तरुण त्यांच्या समोर उभा होता. तो लोकलची वाट पाहत असे असावा,  असे माने यांना वाटले. रेल्वे स्थानकातून मदुराई एक्सप्रेस जाण्याची वेळ झाली होती.

pune immoral relationship marathi news
अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या तरुणाचा मोटारीखाली चिरडून खून; महिलेसह दोघांना अटक
mumbai south central lok sabha constituency marathi news
आमचा प्रश्न – दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ : प्रदूषण, आरोग्याचे प्रश्न मार्गी लागावे
private bus fare mumbai to konkan marathi news, mumbai to konkan private bus marathi news
मुंबईस्थित कोकणवासीय शिमग्यानिमित्त गावी रवाना, खासगी बस कंपन्यांकडून अव्वाच्या सव्वा तिकीट दर आकारणी
Baramati youth murder Bibwewadi
बिबवेवाडीत प्रेमप्रकरणातून बारामतीतील तरुणाचा खून

ठाणे: लोकलच्या दरवाज्यात प्रवाशांच्या हातावर फटके मारून चोरी करणाऱ्याला अटक

एक्सप्रेस रेल्वे स्थानकात येण्यापूर्वीचा भोंगा वाजला. त्यावेळी तरुणाने रेल्वेमार्गात उडी मारली. हवालदार ऋषिकेश माने यांनी चपळाई करून जिवाची पर्वा न करता रेल्वेमार्गात उडी मारून तरुणाला रेल्वे रुळाच्या बाहेर ढकलले. काही क्षणात मदुराई एक्सप्रेस रवाना झाली. रेल्वे स्थानकातील सीसीटीव्हीमध्ये हा घटनाक्रम कैद झाला आहे.