डोंबिवली – कल्याण डोंबिवली पालिकेच्या डोंबिवली पश्चिमेतील ह प्रभाग कार्यालया मागील प्रसाद सोसायटी प्रभागात दत्त मंदिर गल्लीत, ह प्रभागापासून हाकेच्या अंतरावर एका बेकायदा इमारतीची अरूंद जागेत भूमाफियांनी उभारणी सुरू केली आहे. या इमारतीच्या उभारणीमुळे परिसरातील रहिवाशांचा जाण्याचा रस्ता बंद केला आहे. बांधकामाचे साहित्य अस्ताव्यस्त पडल्याने या भागात रोगराई पसरण्याची भीती परिसरातील रहिवासी व्यक्त करत आहेत.

हेही वाचा >>> गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी पिंपरी पोलिसांचा तगडा बंदोबस्त; पिंपरी, चिंचवडमधील वाहतुकीत ‘असा’ आहे बदल!

Radhai building, illegal Radhai building, Dombivli,
डोंबिवलीतील बेकायदा राधाई इमारत भुईसपाट
Ratan Tata Pet Dog came to pay him last tribute
मुक्या प्राण्याची माया! रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांचा…
Navapada, illegal building at Navapada,
सामासिक अंतर न सोडता डोंबिवलीतील नवापाड्यात आठ माळ्याच्या बेकायदा इमारतीची उभारणी
thane building
डोंबिवलीत कोपरमध्ये रस्ता बंद करून बेकायदा इमारतीची उभारणी करणाऱ्या बांधकामधारकांना साहाय्यक आयुक्तांची नोटीस
Dombivli, communal tension in Dombivli,
डोंबिवलीत जातीय तेढ निर्माण करणाऱ्या दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Suicide Kalyan-Dombivli,
११ वर्षाच्या मुलाची प्रेमप्रकरण उघड झाल्याने आत्महत्या, कल्याण- डोंबिवलीत २ आत्महत्या
sai residency demolished
डोंबिवली: आयरेतील बेकायदा साई रेसिडेन्सीवर हातोडा, उच्च न्यायालयाच्या आदेशावरून कारवाई
testament of Shivajirao Jondhale by creating fake medical certificate of doctor in Dombivli
डोंबिवलीतील डॉक्टरचे बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र तयार करून शिवाजीराव जोंधळेंचे मृत्यूपत्र

डोंबिवली पश्चिमेत ह प्रभागाच्या पाठीमागील बाजुला प्रसाद सोसायटी-गावदेवी प्रभागात महात्मा फुले रस्त्यावरील दत्त मंदिराजवळील (गुप्ते रोड, जय हिंद काॅलनीकडे जाणारा रस्ता) दुसऱ्या अरूंद गल्लीत भूमाफियांनी रात्रंदिवस काम सुरू ठेऊन एक बेकायदा इमारत उभारणीस सुरूवात केली आहे. या बेकायदा इमारतीला सामासिक अंतर नाही. या बांधकामाचे साहित्य अस्ताव्यस्त पडले आहे. बांधकामासाठी लागणारे पाणी पालिकेच्या मुख्य जलवाहिनीवरून चोरून घेतले जाते. त्यामुळे या भागाला कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे, असे या भागातील रहिवाशांच्या तक्रारी आहेत. पावसाचे पाणी बांधकामाच्या ठिकाणी साचलेले असते. त्यामुळे साथ रोग पसरण्याची भीती रहिवासी व्यक्त करत आहेत.

हेही वाचा >>> विद्यापीठाच्या आवारात पुन्हा चंदन चोरी- शहरात चंदन चोरट्यांचा धुमाकूळ

पालिकेच्या ह प्रभागाजवळ हे काम सुरू आहे. तरी या प्रभागातील कनिष्ठ अभियंता, बीट मुकादम यांना हे बेकायदा बांधकाम दिसत नाही का, असे प्रश्न रहिवासी करत आहेत. या बेकायदा बांधकामांच्या सभोवती भूमाफिया आणि त्यांच्या समर्थकांचे दिवसभर कडे असते. लगतच्या अधिकृत इमारतींची सुरक्षितता, त्या घरांमध्ये पडणारा अंधार याचा कोणताही विचार न करता भूमाफियांनी हे बेकायदा बांधकाम सुरू केले आहे. ही बेकायदा इमारत सात माळ्याची प्रस्तावित आहे. त्यामधील दोन माळे बांधून तिसऱ्या माळ्याचे बांधकाम घाईने सुरू करण्यात आले आहे.

बांधकामाचे सर्व नियम धाब्यावर बसून या इमारतीचे काम सुरू आहे. पालिका, शासनाचा महसूल बुडवून ही बेकायदा इमारत उभारली जात आहे. त्यामुळे आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी निर्माणाधिन असलेली ही बेकायदा इमारत तातडीने भुईसपाट करण्याचे आदेश ह प्रभाग साहाय्यक आयुक्तांना द्यावेत, अशी मागणी दत्त मंदिर परिसरातील रहिवासी करत आहेत. डोंबिवली पश्चिमेत बेसुमार बेकायदा बांधकामे सुरू आहेत. गेल्या काही महिन्यांपासून बेकायदा बांधकामांवर ह प्रभागातून कारवाई होत नसल्याने तक्रारदारांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. आयुक्त डॉ. जाखड यांनी या प्रभागात खमक्या साहाय्यक आयुक्त देण्याची मागणी तक्रारदार, नागरिक करत आहेत.