scorecardresearch

Premium

वालधुनी किनाऱ्यावरचे बांधकाम हटवले; भूमाफियांनी उभारले होते १२ गाळे, गुन्हा दाखल

अनधिकृत बांधकामाची कीड लागलेल्या उल्हासनगर शहरात चक्क वालधुनी नदीकिनारीच अनधिकृत गाळे उभारल्याचे काही दिवसांपूर्वी समोर आले होते.

Construction on Valdhuni shore removed
उल्हासनगर महापालिकेने गुन्हा दाखल केल्यानंतर मंगळवारी पालिकेच्या वतीने हे गाळे जमीनदोस्त करण्यात आले.(फोटो सौजन्य- लोकसत्ता टीम)

लोकसत्ता प्रतिनिधी

उल्हासनगरः अनधिकृत बांधकामाची कीड लागलेल्या उल्हासनगर शहरात चक्क वालधुनी नदीकिनारीच अनधिकृत गाळे उभारल्याचे काही दिवसांपूर्वी समोर आले होते. या १२ अनधिकृत गाळे उभारणाऱ्यांवर उल्हासनगर महापालिकेने गुन्हा दाखल केल्यानंतर मंगळवारी पालिकेच्या वतीने हे गाळे जमीनदोस्त करण्यात आले. यावेळी महसूल अधिकारी आणि मोठा पोलीस बंदोबस्त होता.

nagpur traffic jam, sitabuldi market, road construction works, roads are closed for construction works,
नागपूरच्या प्रमुख व्यापारपेठेत जायचे कसे? प्रमुख रस्ते बंद
child death due to accidentally hanging at home
आजीला वाचवण्यासाठी गेलेल्या तिशाचा धुरामध्ये गुदमरून मृत्यू
roads waterlogged traffic disrupted due to heavy rain in pimpri chinchwad
पिंपरी-चिंचवडमध्ये संततधार;पाणी साचल्याने रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी
Police raid hookah parlor Gokulpeth
विला ५५ कॅफेत हुक्क्याचा धूर, नागपूरच्या गोकुळपेठेतील हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा

उल्हासनगर शहरात वेळोवेळी अनधिकृत बांधकामे डोके वर काढतात. या बांधकामांवर कारवाई केली जात असली तरी सातत्याने ही बांधकामे उभी राहत असल्याचे समोर आले आहे. मंगळवारीही अशाचप्रकारे पालिका प्रशासनाने कारवाई केली. उल्हासनगर शहरातून वाहणाऱ्या वालधुनी नदीच्या किनारी कॅम्प तीन भागात उल्हासनगर रेल्वे स्थानकाच्या परिसरात सहदेव कंपाऊंड जवळ नदीपात्रात बांधकाम केले जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. त्यानंतर पालिका प्रशासनाने या भागाचा दौरा करून बांधकामे निष्काशीत करण्याचे आदेश नोटीसीद्वारे दिले होते. ही जागा महसूल प्रशासनाची असल्यानी तहसिल कार्यालयालाही ही जागा ताब्यात घेऊन जागेची मालकी कळावी यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. या ठिकाणी उल्हासनगर महापालिकेच्या प्रभाग तीनच्या सहायक आयुक्तांनी दिलेल्या तक्रारींवर दोघांवर महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमांअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आणखी वाचा- पालिका अभियंते, ठेकेदार गायब, डोंबिवली-कल्याणमध्ये वाहतूक पोलिसांकडून खड्डे भरणीची कामे

भूमाफियांनी या ठिकाणी सुमारे १३ हजार चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम उभे केले होते. उल्हासनगर महापालिकेने मंगळवारी येथे उभारण्यात आलेले १२ गाळे जमिनदोस्त केले. उल्हासनगर महापालिकेच्या ५० कर्मचाऱ्यांसह दोन जेसीबी यंत्रे, चारही प्रभागाचे अधिकारी आणि पोलिसांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती उल्हासनगर महापालिकेचे अनधिकृत बांधकाम निष्कासन विभागाचे गणेश शिंपी यांनी दिली आहे. यावेळी महसूल अधिकारीही उपस्थित होते. याप्रकरणी यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आल्याचे शिंपी यांनी सांगितले आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Construction on valdhuni shore removed land mafia had set up 12 pits mrj

First published on: 18-07-2023 at 17:44 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×