ठाणे : मनसेचे आमदार राजू पाटील या ना त्या कारणामुळे चर्चेत असतात. विशेष करून त्यांच्या समाज माध्यमावरील प्रतिक्रिया यांच्यावर सर्वांचे लक्ष असते. विशेष करून राज्य सरकार तसेच शिंदे गटावर त्यांचा रोख अधिक असतो. बुधवारी त्यांनी एक ट्विट एक्स या समाज माध्यमावर प्रसारित केले आहे. या ट्विटच्या आता उलट सुलट चर्चा रंगू लागल्या आहेत. मनसेचे नेते तथा माजी आमदार राजू पाटील हे विविध कारणांमुळे चर्चेत असतात. कल्याण डोंबिवली शहरामध्ये एकनाथ शिंदे गट आणि मनसेचे नेते राजू पाटील यांचे राजकीय वैर सर्वश्रुत आहे. या विधानसभा निवडणुकीत राजू पाटील यांना पराभवाचा धक्का पत्करावा लागला. शिंदे गटाचे राजेश मोरे यांनी त्यांचा धक्कादायक रित्या पराभव केला. यानंतर कल्याण डोंबिवलीतील मनसे आणि शिंदे गट यांच्यामध्ये विस्तवही जात नाही. राजू पाटील हे अनेकदा शिंदे गटावर राजकीय किंवा एखाद्या मुद्द्यावरून थेट हल्ला करत असतात. मनसेने लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला साथ दिली होती. कल्याण येथून महायुतीचे उमेदवार तथा एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांना राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसेने मदत केली होती. त्यानंतर मनसे आणि शिंदे गट पुन्हा एकदा जवळ आले होते. असे असले तरी राजू पाटील यांचे शिंदे गटाला डिवचणे सुरूच होते. तसेच शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे यांच्यासोबत त्यांचे बॅनर वर देखील चर्चेला आले होते. शहरातील रस्त्यावरून देखील राजू पाटील यांनी शिंदे गटाला लक्ष केले होते.

दुसरीकडे मनसेचे नेते राज ठाकरे यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली आहे. त्यामुळे मनसे आणि शिंदे गटांमध्ये राजकीय चर्चा रंगल्या आहेत. दोन्ही गटाचे नेते शिंदे आणि राज ठाकरे एकत्र यावेत अशी चर्चा करत आहेत.त्यातच सोमवारी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्या पायाला श्वानने चावा घेतला. या घटनेनंतर संपूर्ण महापालिका प्रशासन या कुत्र्याच्या शोधात लागले होते. संपूर्ण राज्यभरात हे प्रकरण गाजत आहे. संभाजी भिडे यांना श्वानाने चावा घेतल्यानंतर प्रशासनाला जाग आल्याची तक्रारी नागरिक करत आहेत. राजू पाटील यांनी त्यांच्या एक्स या समाज माध्यमावर एक ट्विट शेअर केले आहे.

या मध्ये त्यांनी म्हटले आहे की “दारात आलेल्या कुत्र्याला तुकडा टाकायचा असतो , बहुतेक भिडे गुरुजी विसरले असतील….!” असे म्हटले आहे या ट्विट मुळे विविध चर्चांना उधाण आले आहे.