scorecardresearch

लहान बालकांसाठी करोना कक्ष सज्ज

करोना संसर्गात लहान मुलांना तातडीने औषधोपचार मिळावेत, यासाठी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून पार्किंग प्लाझा करोना रुग्णालयात लहान मुलांसाठी ५० अतिदक्षता आणि ५० प्राणवायु खाटांची सुविधा निर्माण करण्यात आली असून त्याची महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी सोमवारी पाहणी केली. 

५० अतिदक्षता, ५० प्राणवायू खाटांची व्यवस्था

ठाणे : करोना संसर्गात लहान मुलांना तातडीने औषधोपचार मिळावेत, यासाठी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून पार्किंग प्लाझा करोना रुग्णालयात लहान मुलांसाठी ५० अतिदक्षता आणि ५० प्राणवायु खाटांची सुविधा निर्माण करण्यात आली असून त्याची महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी सोमवारी पाहणी केली. महापालिकेच्या पार्किंग प्लाझा करोना रुग्णालयातील तिसऱ्या मजल्यावर लहान मुलांसाठी अतिदक्षता कक्ष निर्माण करण्यात आला आहे. या कक्षाची स्थापत्य, विद्युत आणि  प्राणवायु सुविधेसह इतर सर्व कामे पूर्ण झाली आहेत. या सर्व कामांची आयुक्त शर्मा यांनी सोमवारी पाहणी केली. पार्किंग प्लाझा करोना रुग्णालयात व्हेंटिलेटरसहित २०६ अतिदक्षता खाटा अणि ८८३ प्राणवायु खाटा कार्यान्वित आहेत. याच रुग्णालयात करोनाग्रस्त लहान मुलांसाठी सर्व सोयी सुविधायुक्त कक्ष उभारण्यात आला असून त्यामध्ये ५० अतिदक्षता आणि ५० प्राणवायूच्या खाटांची सुविधा निर्माण करण्यात आली आहे.  तसेच बाळाला स्तनपान करण्यासाठी विशेष कक्ष आणि मुलांना खेळण्यासाठी प्ले एरिया तयार करण्यात आला आहे.

लसीकरण सुविधा

पार्किंग प्लाझा येथील एकमेव जंबो लसीकरण केंद्रात सकाळी ९ ते रात्री ९ असे एकूण १२ तास नागरिकांच्या सोयीसाठी सतत लसीकरण सत्र सुरू असून यामध्ये १५ ते १८ आणि १८ वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी लसीकरण सत्रे राबविण्यात येत आहेत. आतापर्यंत ६६ हजार  नागरिकांनी या ठिकाणी लसीकरणाचा लाभ घेतला आहे.

रुग्णालयातील सज्जता

  • रुग्णालय परिसरात १३ किलोलिटरच्या दोन मोठय़ा प्राणवायूचा टाक्या कार्यान्वित आहेत. त्या सोबतच प्रतिदिन अतिरिक्त ५ मेट्रिक टन इतका प्राणवायू वातावरणातील हवेतून तयार करता येईल असे ३ पीएसए प्रकल्प कार्यान्वित.
  • रक्त तपासणी, एक्सरे, औषधे या सर्व सुविधा तसेच तज्ज्ञ वैद्यकीय पथक आणि प्रशासकीय पथकाची नेमणूक
  • कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे हृदयरोग संबंधित रुग्ण तसेच आर्थोपेडिक रुग्णांसाठी ६ अतिदक्षता आणि ६ खाटांच्या विलगीकरणाची सुविधा. 

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Corona room ready toddlers ysh

ताज्या बातम्या