बदलापूरः बदलापूर शहरात आता सकाळच्या वेळी फिरण्यासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलेल्या दाम्पत्याची ७० हजारांची सोनसाखळी दुचाकीस्वारांनी ओढल्याची घटना घडली आहे. बदलापूर पूर्वेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते मोहन राऊत चौक दरम्यान ही घटना घडली असून याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा >>> समाधान हॉटेलच्या व्यवस्थापकावर तरुणांचा हल्ला ; काटई-बदलापूर पाईपलाईन रस्त्यावरील घटना

transgender votes went from 32 to 28 in 24 hours difference in figures given to candidate
तृतीतपंथयांची मते २४ तासात ३२ वरून २८ वर, उमेदवाराला दिलेल्या आकडेवारीत तफावत
Tiger from sanctuary missing after collar falls off Nagpur
‘कॉलर’ गळून पडल्याने अभयारण्यातील वाघीण ‘बेपत्ता’
Sanjay Singh
नितीश कुमारांचे बाहेर पडणे ‘इंडिया’ आघाडीसाठी मोठा धक्का? ‘आप’चे संजय सिंह म्हणाले…
narendra modi
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नागपूर दौऱ्यात बदल ?

बदलापूर पूर्वेतील कात्रप परिसरात हणारे राजकुमार महतो मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास नेहमीप्रमाणे फेरफटका मारण्यासाठी  बाहेर पडले होते. ते फिरता फिरता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते मोहन राऊत चौक रस्त्यावर पोहोचले. येथे युनियन बँक आणि अंबरनाथ जयहिंद बँकेच्या समोरील रस्त्यावरून जात असतानाच एका दुचाकीवर दोन जण आले. त्यातील दुचाकीवर मागे बसलेल्या एकाने राजकुमार महतो यांच्या गळ्यावर थाप मारून त्यांच्या गळ्यातील तीन तोळे वजनाची ७० हजार रूपयांची रूद्राक्ष मण्यांनी गुंफलेली सोन्याची साखळी हिसका मारून खेचली आणि पळवली.

यावेळी राजकुमार यांच्या पत्नी आणि ते स्वतः चोर चोर ओरडू लागले. त्यावेळी ओरडू नका माझ्याकडे हत्यार आहे, जीव जाईल शांत रहा,  असेही दुचाकीस्वार म्हणाले आणि पळून गेले. याप्रकरणी राजुकमार यांच्या फिर्यादीवरून बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारानंतर  आता पहाटे फेरफटका मारणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.