scorecardresearch

५१ विकासकांविरुद्ध न्यायालयाचे अटक वॉरंट; २७ गावांतील बेकायदा इमारती प्रकरण

डोंबिवली जवळील २७ गावांमधील १३ गावांच्या हद्दीत ४१ हून अधिक बेकायदा इमारती बांधणाऱ्या ७४ विकासक, वास्तुविशारद यांना कल्याण न्यायालयाने समन्स बजावून गुरुवारी हजर राहण्याचे आदेश दिले होते.

(संग्रहित छायाचित्र)

भगवान मंडलिक
कल्याण : डोंबिवली जवळील २७ गावांमधील १३ गावांच्या हद्दीत ४१ हून अधिक बेकायदा इमारती बांधणाऱ्या ७४ विकासक, वास्तुविशारद यांना कल्याण न्यायालयाने समन्स बजावून गुरुवारी हजर राहण्याचे आदेश दिले होते. दोन जण जामिनासाठी न्यायालयात हजर राहिले. उर्वरित ५१ जणांनी वकिलामार्फत किरकोळ कारणे देऊन न्यायालयात येण्याचे टाळले.
समन्स बजावूनही भूमाफिया न्यायालयात हजर न राहिल्याने न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. समन्स बजावलेल्यांपैकी प्रकाश गंगाराम म्हात्रे, महेंद्र गजराज बेस हे विकासक न्यायालयासमोर जामिनासाठी हजर झाले. न्यायालयाने त्यांचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर त्यांचे जामीन अर्ज फेटाळून, त्यांची रवानगी आधारवाडी तुरुंगात केली.
समन्स बजावलेल्या ५१ जणांना न्यायालयाने अटक वॉरन्ट बजावून ताब्यात घेण्याचे आदेश दिले. न्यायालयाने पुढील सुनावणी ५ मे रोजी ठेवली आहे. बेकायदा इमारत प्रकरणात न्यायालयाने हस्तक्षेप केल्याने माफियांचे धाबे दणाणले आहेत. पालिकेच्या २५ वर्षांत प्रथमच बेकायदा इमारत प्रकरणात एकावेळी माफियांवर न्यायालयीन सुनावणी आणि कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे.
प्रकरण काय
२७ गावातील निळजे, भोपर, आडिवली, ढोकळी, कोळे, नांदिवली, माणगाव, सागाव, सोनारपाडा, माणगाव, काटई, सागाव हद्दीतील सव्‍‌र्हे क्रमांक ७१, ६८, ६३ जमिनींवर माफियांनी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद अधिकारी यांच्या बनावट स्वाक्षऱ्या, शिक्के तयार केले. त्या आधारे बनावट बांधकाम, अकृषिक परवानग्या, खोटे सातबारा उतारे तयार केले. ४१ हून अधिक टोलेजंग बेकायदा इमारती बांधल्या. ‘लोकसत्ता’ने सहा वर्षांपूर्वी हे प्रकरण प्रथम उघडकीला आणले.
पोलीस आरोपपत्रातील ७४ नावे
संतोष पोळ (तुरुंगात), सुजित नलावडे, जयदीप त्रिभुवन, गणेश कदम, बाळू काळे, पंकज कोठावदे, मनोज नेटकर, सतिश सरकटे, सचिन मराठे, अविनाश सिंह, प्रकाश पाटील, ब्रिजेश पांडये, प्रशांत खांडकी, दिनेश पाटील, राहुल नारखेडे, सुरेश मिरकुटे, सागर सिंह, विजय म्हात्रे, संतोषकुमार गुप्ता, सोमनाथ जाधव, विक्रम सिंह, केसराम चौधरी, अतुल खातू, प्रफुल्ल गोरे, सुनील गुरव, प्रकाश पाटील, प्रकाश म्हात्रे (तुरुंगात), विशाल राऊत, रमेश राठोड, जलाद्दुीन शेख, शब्बीर अकोलावाला, आलोक सिंह, सर्जेराव कदम, नासीर खान, महेंद्र बैस (तुरुंगात), अभय भोसले, उदय भिंगार्डे, चेतन जैन, संतोषकुमार दुबे, जहांगिर शेख, शोभाराम चौधरी, भगवान देसले, रफिक खान, नागेंद्र शर्मा, अर्षद खान, अविनाश सावंत, शशिकांत गडे, प्रणाल गायकर, दिनेशकुमार सिंग, अनंत पाटील, राकेश पाटील, महेंद्र पाटील, मंगेश काळण, सुनील यादव, गणेश माळी, विजय शिर्के, भास्कर निंबाळकर, संजय यादव, महेश जगताप, मनोहर काळण, अनिल पाटील, रामलाल भाटिया, दिलीप वझे, मौलिक शहा, विजय जोशी, विठ्ठलराव चव्हाण, विश्वनाथ पाटील, सिद्धेश कीर, मकरंद शिरसाट, पंढरीनाथ गायकर, नारायण काटरमल, नंदकुमार सिंह, रंगनाथ दुबे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Court arrest warrants against developers illegal building cases villages welfare court amy

ताज्या बातम्या