ठाणे : भिवंडी न्यायालयातील कनिष्ठ लिपीक सरफराज शेख (४०) याला दोन हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी मंगळवारी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. तक्रारदार यांचे प्रकरण कारवाईसाठी पुढे पाठविण्याकरिता त्याने ही लाच मागितल्याचे पोलिसांनी सांगितले.

तक्रारदार यांचे भिवंडी न्यायालयात चार प्रकरणे दाखल आहेत. याप्रकरणांची नोंदणी करून ती प्रकरणे पुढील करवाईकरिता पाठविण्यासाठी भिवंडी सह दिवाणी न्यायालयातील कनिष्ठ लिपीक सरफराज याने तक्रारदार यांच्याकडून सुमारे महिन्याभरापूर्वी दोन हजार रुपयांची मागणी केली होती. याप्रकारानंतर तक्रारदार यांनी थेट ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. याप्रकरणाची पोलिसांनी पडताळणी केली असता, सरफराजने लाचेची मागणी करून ती घेतल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सरफराज विरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली.

D Y Chandrachud News in Marathi
‘न्यायव्यवस्था कमकुवत करण्याचा प्रयत्न’; २१ निवृत्त न्यायाधीशांनी डीवाय चंद्रचूड यांना पत्र लिहित व्यक्त केली चिंता
Patna High court
मुलांसाठी पत्नीच्या पालकांकडून पैसे मागणे हा हुंड्याचा प्रकार नाही; उच्च न्यायालयाचा पतीला दिलासा
complaint filed against me in cbi ed by using sim card and aadhaar card chhatrapati sambhajinagar police commissioner manoj lohiya
“आपल्याविरुद्ध सीबीआय, ईडी, ठाण्यात तक्रार दाखल” बनावट फोन, लिंक पाठवण्याचे प्रकार निदर्शनास, पोलीस आयुक्तांची माहिती
Patanjali Expresses Regret
बाबा रामदेव यांना धक्का; सर्वोच्च न्यायालयाच्या कडक भूमिकेनंतर ‘पतंजली’ची बिनशर्त माफी