scorecardresearch

गुन्हे वृत्त : वकील महिलेची ऑनलाइन फसवणूक; कपडय़ांऐवजी चिंध्या

पेशाने वकील असलेल्या ४२ वर्षीय महिलेने एका संकेतस्थळावरून कपडय़ांची खरेदी केली. त्यांच्याघरी कपडय़ांऐवजी चिंध्या पाठविण्यात आल्या.

ठाणे :  पेशाने वकील असलेल्या ४२ वर्षीय महिलेने एका संकेतस्थळावरून कपडय़ांची खरेदी केली. त्यांच्याघरी कपडय़ांऐवजी चिंध्या पाठविण्यात आल्या. यासंबंधीची तक्रार देण्यासाठी संपर्क साधला असता एका भामटय़ाने त्यांच्या खात्यातील १८ हजार रुपये गायब केले. या प्रकरणी ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सदर महिलेने   महिन्याभरापूर्वी   ऑनलाइन खरेदी अ‍ॅपवरून ३७४ रुपयांचे कपडे खरेदी केले होते. पाच दिवसांनी एक भरलेला खोका त्यांच्या घरी पोहच झाला. त्यांनी खोका उघडून पाहिला असता त्यामध्ये केवळ कपडय़ाच्या चिंध्या आढळून आल्या. त्यानंतर महिलेने गूगलवर संबंधित कंपनीच्या ग्राहक सेवा क्रमांकाचा शोध घेतला. त्यांना एक मोबाइल क्रमांक आढळून आला. त्यांनी त्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून संबंधित व्यक्तीस घडलेला प्रकार सांगितला. त्या व्यक्तीने त्यांच्या मोबाइलवर एक अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. महिलेने अ‍ॅप डाऊनलोड करताच त्यांच्या बँक खात्यातील १८ हजार रुपये त्या भामटय़ाने काढून घेतले. आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर काही दिवसांपूर्वीच या महिलेने या प्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याआधारे सोमवारी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Crime news lawyer woman online fraud rags instead amy

ताज्या बातम्या